"मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग"; छावा' सिनेमातील 'हे' संवाद गाजले; टाळ्या अन् शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:39 IST2025-02-18T10:25:26+5:302025-02-18T11:39:10+5:30
'छावा' सिनेमातील हे संवाद लोकांच्या मनावर कोरले गेले आहेत. जाणून घ्या (chhaava)

'छावा' सिनेमाची जितकी चर्चा झाली तितकीच सिनेमाच्या डायलॉगची सुद्धा. 'छावा' सिनेमातील गाजलेले संवाद कोणते यावर एक नजर
"शेर नहीं रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है", हा संवाद चांगलाच लोकप्रिय झाला. छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती शंभूराजांनी दख्खनमध्ये त्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाच्या कसे नाकीनऊ आणले, हे यातून दिसतं.
"हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं"- जेव्हा छत्रपती संभाजी महाराज बुऱ्हाणपूरला लूट करतात त्यावेळी गनिमांना हरवल्यानंतर हा संवाद सर्वांचं लक्ष वेधतो
"मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग, हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा एक नया संभा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी"- शंभूराजांना कैद झाल्यावर ते औरंगजेबासमोर ताठ मानेने हा संवाद म्हणताना दिसतात
"हमे हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर शण्यंत्र को तोड़ेंगे, छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे, जय भवानी"- बुऱ्हाणपूरची लूट झाल्यानंतर मावळ्यांना संबोधित करताना छत्रपती संभाजी महाराज हा संवाद म्हणताना दिसतात.
औम नमः पार्वती पतये, हर हर महादेव, जय भवानी- सहकारी मावळ्यांच्या मनात स्फूरण निर्माण करण्यासाठी छत्रपती शंभूराजे हा संवाद म्हणताना दिसतात. त्यावेळी विकीच्या अभिनयाने या संवादांनी थिएटर चांगलंच दुमदुमलं
"भोंसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी गति को पार्वत भी नहीं रोक पाया, उसका कोई क्या बिगाड़ लेगा"- महाराणी येसूबाई छत्रपती शंभूराजांना हा संवाद म्हणताना दिसतात. भोसल्यांचा पराक्रमी वारसा या संवादांमध्ये पाहायला मिळतो.