क्या बात!! श्रेया बुगडेचं Stunning फोटोशूट; लेडी बॉस लूकची होतीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 14:21 IST2024-01-05T14:14:30+5:302024-01-05T14:21:15+5:30
Shreya bugade: श्रेयाचा हा अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे.

'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
विनोदाच्या दुनियात स्त्रियाही मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं.
श्रेयाने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाव्यतिरिक्त काही गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
श्रेया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
श्रेयाने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये ती लेडी बॉस लूकमध्ये दिसून येत आहे.
श्रेयाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.
चाहत्यांसोबतच कलाकार मंडळी सुद्धा तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत.
काळ्या रंगाच्या ब्लेझर आणि फॉर्मल पँटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.