कोण आहे 'ही' कॅलेंडर गर्ल? इमरान हाश्मीच्या 'हक' सिनेमातून करतेय डेब्यू, सौंदर्यात यामीला देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:03 IST2025-11-05T17:48:18+5:302025-11-05T18:03:57+5:30

इमरान हाश्मीच्या 'हक' सिनेमातून करतेय डेब्यू, सौंदर्यात यामीला देते टक्कर, कोण आहे ती?

बॉलिवूड अभिनेता इमराम हाश्मी आणि यामी गौतमीची प्रमुख भूमिका असलेल्या 'हक' चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

येत्या ७ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भारतातील ज्वलंत विषयावर 'हक' चित्रपट आधारीत असून सर्वांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

दरम्यान,या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीला एक नवा चेहरा देखील मिळाला आहे.

या अभिनेत्रीचं नाव वर्तिका सिंग आहे. मॉडेलिंगमध्ये नशीब अजमावल्यानंतर वर्तिकाने आता बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली आहे.

वर्तिका सिंग २०१९ मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. याशिवाय २०२५ सालची ती मिस फेमिना इंडियाची विजेती आहे.

वर्तिकाच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर लखनऊ युनिव्हर्सिटीतून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तसेच किंगफिशर ब्रॅण्डची कॅलेंडर गर्ल म्हणूनही ती ओळखली जायची.

अभिनयासह वर्तिका काही एनजीओ देखील चालवते. शिवाय आरोग्यविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी हक चित्रपटामुळे आता ही अभिनेत्री प्रसिद्धीझोतात आली आहे. शिवाय सगळीकडे चित्रपटापेक्षा तिच्या सौंदर्याची चर्चा होत आहे.

'हक' या चित्रपटाचं दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटात वर्तिका सिंग, दानिश हुसेन, शीबा चढ्ढा या कलाकारांनी महत्त्वपूर्ण पात्रे साकारली आहेत.