शाहरूखच्या बर्थडे पार्टीत MS धोनीबरोबर दिसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 02:44 PM2023-11-03T14:44:40+5:302023-11-03T15:01:47+5:30

धोनी फारसा पार्ट्यांमध्ये दिसत नाही, पण काल तो एक मुलीसोबत दिसला...

MS Dhoni at Shahrukh Khan Bday Party: बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचा २ नोव्हेंबरला वाढदिवस झाला. 'मन्नत'वर त्याची बर्थडे पार्टी रंगली. या पार्टीत बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसोबतच 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचीही हजेरी होती.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनी फारसा कुठे दिसत नाही. पण शाहरूखच्या पार्टीसाठी मात्र त्याने उपस्थिती लावली. यावेळी त्याच्याबरोबर एका तरूणीचा फोटो व्हायरल झाला असून त्याची चर्चा आहे.

धोनीबरोबर असलेली ही तरूणी नक्की आहे तरी कोण, असा साऱ्यांनाच प्रश्न पडला आहे. केवळ धोनीच नव्हे तर आलिया भट, दीपिका पादुकोन, रणवीर सिंग यांच्यासोबतही तिचे कालच्या पार्टीतील फोटो दिसत आहेत.

धोनीसोबतची ही तरूणी म्हणजे, एक लोकप्रिय बिझनेसवुमन असून तिचे नाव आहे फौजिया आदिल बट. बॉलिवूड, हॉलिवूडसह क्रीडाक्षेत्रातील सेलिब्रिटींमध्ये हे नाव परिचीत आहे.

फौजिया ही FAB एन्टरटेनमेंट या कंपनीची सीइओ आणि पार्टनर आहे. ही कंपनी मूळत: कतारमधली आहे. सेलिब्रिटी मॅनेजमेंट या क्षेत्रात ही कंपनी नावाजलेली आहे.

फौजिया गेल्या १५ वर्षांपासून या क्षेत्रात काम कार्यरत आहे. नुकत्याच झालेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळीही ती निमंत्रितांपैकी एक होती.

टीम इंडियाचा 'रनमशिन' स्टार फलंदाज विराट कोहली याच्यासोबतही तिचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम पेजवर आहे. त्यामुळे फौजिया ही बॉलिवूड आणि परदेशी सेलिब्रिटींसोबतच क्रीडा क्षेत्रातही लोकप्रिय असल्याचे दिसते. (फोटो सौजन्य- फौजिया आदिल बट इन्स्टाग्राम आणि सोशल मिडिया)