विक्रांत मेस्सी भावांसोबत अ‍ॅडल्ट फिल्म पाहताना पकडला जातो तेव्हा..., वाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 07:00 AM2021-07-02T07:00:00+5:302021-07-02T07:00:02+5:30

Vikrant Massey : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांतने स्वत: हा किस्सा सांगितला....

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या ‘हसीन दिलरूबा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

विक्रांत बॉलिवूडचा गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या साधाभोळ्या चेह-यावर तरूणाई फिदा आहे. पण त्याच्या साध्याभोळ्या चेह-यावर जाऊ नका.

होय, विक्रांत ख-या आयुष्यात चांगलाच ‘महागुणी’ आहे. त्याचा हा किस्सा ऐकल्यानंतर तुम्हालाही हे पटल्याशिवाय राहणार नाही.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विक्रांतने स्वत: हा किस्सा सांगितला. तर झाले असे की, विक्रांत त्याच्या भावांसोबत अ‍ॅडल्ट फिल्म पाहत होता आणि अचानक मावशी आली...

आर जे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सीने हा किस्सा सांगितला. माझ्या आयुष्यातील सर्वात लाजिरवाणा प्रसंग माझ्या आजीच्या घरी घडला होता, असे तो म्हणाला.

मी माझ्या भावंडांसोबत अडल्ट फिल्म पाहत होतो आणि तेवढ्यात माझी मावशी आमच्या खोलीत आली. ती पहाटे ३ वाजता उठून आमच्या खोलीत येईल, असा विचारही आम्ही केला नव्हता. आम्ही सर्वच पकडले गेलो होतो, असे त्याने सांगितले.

मावशीने आम्हाला पकडल्यानंतर मला काही दिवस आजीच्या घरी राहायचं होतं पण त्यादरम्यानच्या काळात मला मावशीच्या समोर जाण्याचीही लाज वाटत असे. पण माझी मावशी चांगली आहे. तिने काहीच आईला सांगितले नाही. मुलं आता मोठी झाली आहेत, हे तिला ठाऊक होते, असे विक्रांत म्हणाला.

विक्रांतच्या ‘हसीन दिलरूबा’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर यात तापसी पन्नू व हर्षवर्धन राणे हेही मुख्य भूमिकेत आहे.

एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित या चित्रपटात तापसी आणि विक्रांतची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. अचानक त्यांच्या आयुष्यात हर्षवर्धनची एंट्री होते आणि दोघांचेही आयुष्य अचानक बदलून जाते, असे याचे कथानक आहे.

Read in English