डॉनची हिरोईन! 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडापिसा झाला होता दाऊद, दोघांचे फोटो व्हायरल झाले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:18 PM2023-12-18T17:18:05+5:302023-12-18T17:28:40+5:30

दाऊदचे बॉलिवूडशी असलेले संबंधही एकेकाळी चर्चेचा विषय होता.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टरमाईंड असलेल्या दाऊदवर विषप्रयोग केल्याची माहिती आहे.

दाऊदवर सध्या कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

पण, यामुळे दाऊदबद्दल पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. दाऊदचे बॉलिवूडशी असलेले संबंधही एकेकाळी चर्चेचा विषय होता.

८०-९०च्या दशकात अभिनयाबरोबर सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या मंदाकिनीबरोबर दाऊदचं नाव जोडलं गेलं होतं. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या 'राम तेरी गंगा मेरी' या सिनेमातील बोल्ड सीनची प्रचंड चर्चा रंगली होती.

यानंतर मंदाकिनी प्रसिद्धीझोतात आली होती. या सिनेमानंतर तिला अनेक चित्रपटांचा ऑफर येत होत्या. पण, एका फोटोमुळे मंदाकिनीचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झालं.

मंदाकिनीच्या सौंदर्याची भुरळ दाऊदलाही पडली होती. तो तिच्यासाठी वेडा झाला होता. याचदरम्यान मंदाकिनीचा दाऊदबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता.

१९९४ मध्ये व्हायरल झालेल्या या फोटोत ती स्टेडियममध्ये दाऊदच्या बाजूला बसल्याचं दिसत होतं. या फोटोनंतर मंदाकिनीने दाऊदशी लग्न केल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, यात काही तथ्य नसल्याचं अभिनेत्रीने सांगतिलं होतं.

पण, दाऊदबरोबरच्या या फोटोमुळे मंदाकिनीच्या करिअरला उतरती कळा लागली. यानंतर तिला निर्माते आणि दिग्दर्शकाकडून चित्रपटासाठी ऑफर मिळाल्या नाहीत. १९९६ साली प्रदर्शित झालेला जोरदार हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला.

मंदाकिनीने १९९० साली प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्याशी विवाह करत संसार थाटला. तिला इनाया आणि राबिल ही दोन मुलं आहेत.