Preity Zinta : "माझ्यावर जळती सिगारेट फेकली, त्याने मला खोलीत बंद केलं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 19:36 IST2025-01-07T19:10:17+5:302025-01-07T19:36:14+5:30
Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा ही आता दोन मुलांची आई आहे.

अभिनेत्री प्रीती झिंटा ही आता दोन मुलांची आई आहे. ती तिचं आयुष्य खूप आनंदात जगत आहे. मात्र याआधी ती नेस वाडियासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
प्रीतीने पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं होतं की, नेस वाडियाने तिच्यावर जळती सिगारेट फेकली आणि तिला खोलीत बंद केलं.
अभिनेत्रीने पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटलं की, "मला असं वाटतं की त्याला (नेस वाडिया) माझ्यापासून लांब ठेवलं पाहिजे, जेणेकरून मी शांतीने जगू शकेन."
"जर असं झालं नाही तर एक दिवस असा येईल की तो मला मारून टाकेल. मला खूप भीती वाटतेय."
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया हे दोघेही क्रिकेटमुळे जवळ आले. दोघांनी मिळून २००८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब टीम खरेदी केली. पण २०१४ मध्ये सर्व बदललं.
प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांचं ब्रेकअप झालं. ते आता एकमेकांच्या समोर आले तरी एकमेकांकडे बघत देखील नाहीत.