आशा भोसले पांढऱ्या रंगाच्या साड्या का नेसायच्या? लतादीदींसोबत जोडलीये खास आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:20 IST2026-04-13T11:08:50+5:302026-04-13T11:20:02+5:30
...म्हणून आशा भोसले पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसायच्या; स्वत:च सांगितलेलं कारण, म्हणालेल्या-" लतादीदीने…"

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं असून कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल १२ एप्रिल २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आपल्या चिरतरुण आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान गायिका हरपली आहे.

भारतीय संगीतक्षेत्रात त्यांच्या अनेक कलाकृतींना आजही तोड नाही. संगीतातील विविध प्रकारांवर त्यांनी आपल्या स्वरसाजाची छाप सोडली आहे.

भारतीय संगीत विश्वात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यसंगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर होते. मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. भारतरत्न लता मंगेशकर या त्यांच्या थोरल्या बहीण होत्या.आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक किस्से चर्चेत आहेत. ज्यामध्ये त्यांनी त्या नेहमी सफेद साडी का नेसायच्या? याचं कारण स्वत: आशा भोसले यांनी सांगितलं.

एकदा आशा भोसले यांनी अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या 'कपल ऑफ थिंग्ज' या पॉडकास्टवर हजेरी लावली होती.तेव्हा त्यांनी लता मंगेशकर यांची आठवण सांगितली होती. तसेच आशा भोसले यांनी हेही स्पष्ट केलं की, त्या आणि दीदी पांढऱ्या साड्या का घालत असत. अनेकदा या दोघी मंगेशकर बहिणी पांढर्या साडीतच अनेकदा दिसल्या आहेत.

त्यादरम्यान, दीदींची आठवण सांगत आशा भोसले म्हणाल्या, "दीदी आणि मी नेहमीच पांढऱ्या साड्या नेसायचो. पांढरा रंग आमच्या त्वचेला जास्त शोभेल असं वाटायचं. जर आम्ही इतर रंग घातले तर आम्ही कदाचित सावळ्या दिसू असं वाटायचं."

पुढे आशा भोसले म्हणालेल्या, " त्यानंतर मी गुलाबी रंगाच्या साड्या नेसायला लागले आणि दीदी माझ्याकडे पाहतच राहायची. पण हळूहळू मी गुलाबीसोबत इतर रंगाच्या साड्याही नेसायला लागले."

आशा भोसले यांनी आपल्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत मराठी आणि हिंदीसह २० भाषा आणि १२,०० हून अधिक गाणी गायली. ओ. पी. नय्यर आणि एस. डी. बर्मन यांच्यासोबत गाणी गाऊन आशा भोसले यांनी संगीत विश्वात स्वत चा एक वेगळा ठसा उमटवला. १९६० मधील 'रंगीला' सिनेमातील 'परा तनहा तनहा' ही आशा भोसलेंची गाणीही विशेष गाजली.

















