फरार होण्यापूर्वी विजय मल्ल्या यांनी केलेलं 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं कन्यादान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:51 IST2025-06-09T12:28:37+5:302025-06-09T12:51:47+5:30

तुम्हाला माहितेय का विजय मल्ल्या यांनी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं कन्यादान केलं होतं?

विजय मल्ल्या (Vijay Mallya) हे एक असं नाव आहे जे कायमच वादात राहिलंय. मग ते क्रिकेट असो की बॉलिवूडमधील अभिनेत्रींशी जोडले जाणारे त्यांचे नाते.

अशातचं जेव्हा आरसीबीने आयपीएल जिंकलं, तेव्हा विजय माल्यानं लंडनमधूनच जल्लोष साजरा केला. एवढेच नाही तर ते थेट राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये पोहचले.

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची माफीही मागितली. त्याचबरोबर भारताबाहेर राहण्याच्या कारणाचाही त्यांनी बचाव केलाय.

यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. सगळीकडे विजय मल्ल्या यांची चर्चा सुरू आहे.

अशातच विजय मल्ल्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची एक धक्कादायक गोष्ट पुन्हा समोर आली आहे. त्यांनी बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीचं कन्यादान केलं होतं.

ही अभिनेत्री म्हणजे दुसरी-तिसरी कोणी नसून समीरा रेड्डी (Sameera Reddy) आहे. समीरा रेड्डीनं DNA या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत (Vijay Mallya Performed Sameera Reddy’s Kanyadaan ) याबाबतचा खुलासा केला होता.

या मुलाखतीत समीरा रेड्डीनं सांगितलं की, तिचं कन्यादान विजय माल्यांनी केलं होतं. विजय माल्या हे तिच्या आईकडून नात्यातले आहेत आणि त्यांनीच हा पवित्र विधी पार पाडला होता.

समीरा म्हणाली होती, "विजय मल्ल्या हे माझ्या आईच्या माहेरकडचे नातेवाईक आहेत, त्यांनीच माझा हात माझ्या नवऱ्याच्या हातात दिला. त्याशिवाय लग्नात फक्त मित्र आणि कुटुंब होते".

समीरा एकेकाळी आपल्या अभिनय, सौंदर्य आणि बोल्ड लूकसाठी ओळखली जात होती. २१ जानेवारी २०१४ रोजी समीरानं अक्षय वर्दे यांच्यासोबत महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह केला होता.

सध्या समीरा रेड्डी अभिनयापासून दूर आहे. ती सध्या पूर्णपणे आपल्या कुटुंब आणि मुलांकडे लक्ष देत आहे. तिच्या करिअरमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र आता ती ग्लॅमरपासून थोडी दूरच राहते.