'12th Fail' मुळे चमकले विक्रांत मेसीचे नशीब, असा पदरी पडला सुपरहिट सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 06:01 PM2024-02-05T18:01:17+5:302024-02-05T18:17:02+5:30

'12th Fail' चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी मुख्य भूमिकेसाठी विक्रांत मेसीची निवड का केली याचा खुलासा केला.

विधु विनोद चोप्रा यांच्या 12th Fail या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. या सगळ्यात सर्वाधिक कौतुक झालं ते आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीचं.

'12th Fail' हा 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. विक्रांतनं जीव ओतून साकारलेलं ते पात्र चाहत्यांच्या मनात घर करुन गेलं.

'12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. त्यांचं कौतुक करताना चाहते आणि सेलिब्रेटी थकत नाही आहेत.

69th फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 12th फेल हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. विक्रांत मेसीला क्रिटिक्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर विधु विनोद चोप्रा यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी विक्रांतची मुख्य भूमिकेसाठी निवड का केली याचा खुलासा केला.

विधू विनोद चोप्रा यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, 'राजकुमार हिरानी यांनी मनोज कुमार शर्माच्या भूमिकेसाठी विक्रांतचे नाव सुचवले होते.

राजकुमार हिरानी यांच्यामुळेच विक्रांतच्या पदरी हा सिनेमा पडला. मिळालेल्या संधीचं सोनं विक्रातंन करुन दाखवलं.

'12th Fail'या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांच्याशिवाय अनंत व्ही जोशी आणि अंशुमन पुष्कर यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली. या सिनेमाची गोष्ट खूपच भावनिक आहे.

आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची ही कथा आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्था, लोकांची विचारसरणी आणि व्यवस्थेवरही हा सिनेमा भाष्य करतो.

विक्रांत 'दिल धडकने दो', 'अ डेथ इन द गुंज' आणि 'छपाक' सारख्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केलं. सिनेमा नाही तर विक्रांतनं वेबसीरिजमध्ये दमदार कामगिरी केली. 'मिर्झापूर' आणि 'क्रिमिनल जस्टिस' सारख्या वेबसीरिजमधून त्याची लोकप्रियता आणखी वाढली.