रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...! विकी कौशल पहिल्यांदाच पोहोचला रायगडावर, शेअर केला 'छावा'चा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:35 IST2025-02-19T16:33:14+5:302025-02-19T17:35:27+5:30

विकी कौशलने आज शिवजयंतीनिमित्त खास फोटो शेअर केलेत. हे फोटो पाहून सर्वांनी विकीचं कौतुक केलंय (chhaava movie)

आज शिवजयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात उत्सव साजरा केला जात आहे.

शिवजयंतीनिमित्त विकी कौशल आज रायगडला गेला होता. यानिमित्त विकीने सर्वांना दिलेला शब्द पाळला. विकी 'छावा' रिलीज झाल्यावर पहिल्यांदाच रायगडला आला.

सध्या विकी कौशलचा 'छावा' सिनेमा चांगलाच गाजतोय. त्यावेळी शिवजयंतीचं सेलिब्रेशन करण्यासाठी विकी रायगडने सर्वांसोबत रायगडला भेट दिली.

विकी यावेळेस शिवरायांचरणी नतमस्तक झालेला दिसला. पांढरा कुर्ता आणि फेटा बांधून विकी रायगडला गेला होता.

रायगडावर सिंहासनारुढ छत्रपतींच्या प्रतिमेसमोर विकी कौशल नतमस्तक झाला. छत्रपतींच्या प्रतिमेला विकी हार घालताना दिसला

उपस्थित चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत विकी कौशलने रायगडावर हजेरी लावली. विकीला भेटण्यासाठी त्याचे असंख्य चाहते आले होते.

यावेळी विकी कौशलसोबत 'छावा'चे निर्माते आणि मॅडॉक फिल्मचे सर्वेसर्वा दिनेश विजनही उपस्थित होते.

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी विकी कौशलला छत्रपती शिवरायांची प्रतिमा सदिच्छा भेट म्हणून दिली.