Varun Dhawan Wedding Photos: वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाचा सुंदर वेडिंग अल्बम, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 09:48 AM2021-01-26T09:48:20+5:302021-01-26T09:48:20+5:30

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे लव्हबर्ड्स रविवारी लग्नबंधनात अडकले आहेत. (Photo Instagram)

या शाही विवाह सोहळ्याचे सुंदर फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)

अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. (Photo Instagram)

वरूण व नताशा एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र आत्ताआत्तापर्यंत दोघांनीही याचा कोणालाही थांगपत्ता लागू दिला नव्हता. (Photo Instagram)

नताशा गेल्या अनेक वर्षांपासून वरुण धवनची गर्लफ्रेन्ड असली तरी तिने लाईम लाईट पासून स्वत:ला दूर ठेवले होते. (Photo Instagram)

नताशा आणि वरुण दोघे एकमेकांना अगदी शालेय जीवनापासून ओळखतात. तेव्हापासून जपलेल्या मैत्रीचे रुपांतर आता लग्नात झाले. (Photo Instagram)

नताशा एक फॅशन डिझायनर आहे. 2013 मध्ये नताशाने फॅशन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केले. (Photo Instagram)