अजय देवगणच्या 'दृश्यम २'च्या समोर वरुण धवनचा भेडिया ठरला फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंत किती केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:43 PM2022-12-01T16:43:18+5:302022-12-01T17:36:23+5:30

दोन आठवड्यानंतरही अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करतो आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट ‘दृश्यम 2’ आणि वरुण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आहेत.

अजय देवगणचा 'दृश्यम 2' रिलीज होऊन दोन आठवडे झाले आहेत, तरी ही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'दृश्यम 2' या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 160 कोटींचा गल्ला जमावला आहे.

दुसरीकडे, दृश्यम 2 समोर, वरूण धवन आणि क्रिती सॅननचा 'भेडिया' चित्रपट तग धरु शकला नाही.

भेडिया चित्रपटानं एका आठवड्यात 40 कोटींचा बिझनेस आहे.

अजय देवगणचा 'दृश्यम 2' बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार कमाई करतोच आहे.