Urvashi Rautela Rishabh Pant Memes: "आग ऐसी लगाई मजा आ गया..."; उर्वशी रौतेला-रिषभ पंत वादावर भन्नाट मीम्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:56 IST2022-08-12T15:31:12+5:302022-08-12T15:56:15+5:30
रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यात मुलाखतीनंतर सुरू झालाय वाद

Urvashi Rautela vs Rishabh Pant: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिषभ पंत या दोघांमधील एक वाद सध्या बराच गाजतोय. काही वर्षांपूर्वी रिषभ पंत उर्वशीला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये बरेच तास थांबला होता अशी चर्चा होती. त्यावर उर्वशीने Mr RP असं नाव घेत काही गोष्टी मुलाखती दरम्यान सांगितल्या. Mr RP चे मला १७ मिस्ड कॉल होते असा दावा उर्वशीने केला होता. त्यावर रिषभ पंतने तिला मेरा पिछा छोड दो बेहेन अशा आशयाची इन्स्टा स्टोरी टाकून ट्रोल केलं होतं. त्यानंतर छोटू भैय्या आप बॅट बॉल खेलो, असं उत्तर उर्वशीनेही इन्स्टापोस्टच्या मार्फत दिलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले आहेत. पाहूया त्यापैकी काही निवडक मीम्स...
प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान याच्या 'पिघलना नहीं है...' वरून मीम्स
आग ऐसी लगाई मजा आ गया...
उर्वशी विरूद्ध रिषभच्या बातम्या युक्रेन विरूद्ध रशिया युद्धाच्या बातम्यांपेक्षा जास्त चवीने वाचल्या जातायत.
जली ना.. तेरी जली ना...
मध्येच रियान परागचं मीमदेखील झालं व्हायरल
Mr RP नक्की कोण.... रिषभ पंत, रिकी पॉन्टींग आणि रियान पराग
Mr. RP म्हणजे रिकी पॉन्टींग की काय...