Urvashi Rautela : 'डाकू महाराज'मध्ये उर्वशीची ३ मिनिटांची भूमिका, मिळाली ३ कोटी फी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:34 IST2025-02-21T12:27:44+5:302025-02-21T12:34:14+5:30

Urvashi Rautela : चित्रपटात अभिनेत्रीची ३ मिनिटांची भूमिका होती

अभिनेत्री उर्वशी रौतेला 'डाकू महाराज' या चित्रपटामुळे चर्चेत असते. पण यासाठी तिने नक्की किती फी आकारली याबाबत आता विविध गोष्टी बोलल्या जात आहेत.

या चित्रपटात अभिनेत्रीची ३ मिनिटांची भूमिका होती. असं असूनही तिची फी जास्त असल्याचं सांगितलं जातं. चित्रपटातील मुख्य कलाकार नंदमुरी बालकृष्ण आहेत.

ईटी नाऊच्या रिपोर्टनुसार, उर्वशीने डाकू महाराज या चित्रपटातील तिच्या काही मिनिटांच्या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये घेतले आहेत.

यापूर्वीचे अनेक चित्रपट लोकप्रिय झाले नसले तरी डाकू महाराजमधील तिने अभिनयाच्या प्रत्येक मिनिटासाठी १ कोटी रुपये मागितल्याचं म्हटलं जातं.

या अभिनेत्रीची एकूण संपत्ती २३६ कोटी रुपये असल्याचं सांगितले जातं. तिचे इन्स्टाग्रामवर ७३ मिलियन फॉलोअर्स आहेत. आजकाल ती तिच्या विधानांमुळे चर्चेत आहे.

डाकू महाराजच्या ओटीटी रिलीजमधून तिने सीन्स हटवण्यात आल्याची चर्चा आहे. ती पोस्टरमधूनही गायब होती.

सूत्रांचं म्हणणे आहे की उर्वशी ओटीटी रिलीजचा एक भाग आहे. प्रसिद्धीसाठी तिने तिचे सीन काढून टाकल्याची बातमी पसरवली.