"तोंडावर थुंकला, पोटात लाथा मारल्या, मान धरली अन्..."; अभिनेत्रीला नवऱ्याने केलेली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:25 IST2025-05-28T14:10:15+5:302025-05-28T14:25:00+5:30

Arzoo Govitrikar Domestic Violence: 'एक लडकी अनजानी सी', 'घर एक सपना', सीआयडी आणि 'नागिन २' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. अभिनेत्री आरजू गोवित्रीकरला काही वर्षांपूर्वी तिच्या पतीने मारहाण केली होती. तिने पतीवर गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत आरजूने याबाबत धक्कादायक खुलासा केला होता.

आरजू गोवित्रीकर ही अदिती गोवित्रीकरची बहीण आहे. आरजूने 'एक लडकी अनजानी सी', 'घर एक सपना', सीआयडी आणि 'नागिन २' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. ती 'बागबान' चित्रपटातही दिसली. तिने इतर काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

आरजूला ना करिअरमध्ये यश मिळालं ना वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळाला. अभिनेत्रीने २०१० मध्ये बिझनेसमन सिद्धार्थ सभरवालशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगाही आहे. हे लव्ह मॅरेज होतं. पण २०१९ मध्ये तिने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आणि घटस्फोटासाठीही अर्ज केला.

आरजूने तिच्या पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये त्याने दारूच्या नशेत तिच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. तसेच पती सिद्धार्थने तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती.

२०२० मध्ये दाखल केलेल्या तक्रारीत अभिनेत्रीने म्हटलं होतं की, एकदा वाद झाला तेव्हा सिद्धार्थ तिच्या तोंडावर थुंकला. सिद्धार्थसोबत दारू पिण्यावरून भांडण झालं तेव्हा त्याने तिला बाथरूममध्ये फरफटत नेलं आणि बेदम मारहाण केली.

अभिनेत्रीने २०२१ मध्ये 'ईटाइम्स'शी संवाद साधताना म्हटलं होतं की, "त्याने माझी मान धरली आणि घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कानाखाली मारली, माझ्या पोटात लाथा मारल्या."

"आयुष्यात असे काही दिवस होते जेव्हा मला मारहाण केली जात असे आणि मी बाहेर जाऊ शकत नव्हते कारण मला माझ्या जखमा कोणीही पाहू नयेत असं वाटत होतं."

आरजूने म्हटलं होतं की, सिद्धार्थ तिच्यावर खूप शिवीगाळ करायचा. लग्नाच्या दोन वर्षांनंतरच तिच्यावर हात उचलायला लागला. मुलाच्या जन्मानंतर तो तिच्यापासून वेगळा झाला. तो दुसऱ्या खोलीत झोपू लागला.

आरजू गोवित्रीकरने तिच्या पतीवर एक्स्ट्रा आरोपही केला आणि म्हटलं की नवऱ्याची एक रशियन गर्लफ्रेंड आहे जिच्याशी तो सतत चॅट करतो. आरजूकडे ते सर्व चॅट्स आहेत.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये अभिनेत्रीचा नवरा तिला मारहाण करताना दिसत होता. आरजूने २०१९ मध्ये तिच्या पतीला घटस्फोट दिला. आता ती 'चाहेंगे तुम्हें इतना' या टीव्ही शोमध्ये दिसत आहे.