'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:13 IST2025-06-19T17:38:57+5:302025-06-19T18:13:17+5:30

यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप १० गाणे कोणते? यादीत बॉलिवूड, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांचा समावेश आहे.

भारतात दररोज लाखो लोक गाणी ऐकतात आणि पाहतात. यूट्यूबवरील आकडेवारीनुसार, भारतातील टॉप १० सर्वाधिक पाहिलेली गाणी (Most viewed Indian songs on YouTube) कोणती आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या यादीत अनेक सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक व्ह्यूज मिळवून जे गाणं पहिल्या क्रमांकावर विराजमान झालं आहे, ते खरंच आश्चर्यचकित करणारं आहे.

सर्वांत पहिल्यांदा आपण दहाव्या क्रमांकावर कोणते आहेत ते जाणून घेऊया. तर 'मिले हो तुम हमको के' या गाण्याचे रिप्राइज व्हर्जन नेहा कक्करने (Neha Kakkar) टोनी कक्करसोबत (Tony Kakkar) गायलं होतं. या गाण्याला १.३ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे १० व्या क्रमांकावर आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ( Shraddha Kapoor) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचे 'बागी' चित्रपटातील 'छम छम'(Cham Cham) हे गाणे १.४ अब्ज व्ह्यूजसह नवव्या क्रमांकावर आहे.

आठव्या क्रमांकावर आहे 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील नोरा फतेहीचे (Nora Fatehi) 'दिलबर' (DILBAR) हे गाणे. या गाण्याला तब्बल १.४ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

इमरान हाश्मीचं (Emraan Hashmi) 'लुट गए' (Lut Gaye) हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. या गाण्याला १.४ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे सातव्या क्रमांकावर आहे.

नीरू बाजवा यांचे लोकप्रिय पंजाबी गाणे 'लौंग लाची' (Laung Laachi) हे यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. या गाण्याला १.६ अब्ज व्ह्यूज मिळाले आहेत.

धनुष (Dhanush) आणि साई पल्लवी यांचे गाणे 'राउडी बेबी' (Rowdy Baby) हे १.६ अब्ज व्ह्यूजसह पाचव्या क्रमांकावर आहे.

चौथ्या क्रमांकावर राहत फतेह अली खान ( Rahat Fateh Ali Khan) यांचे 'जरूरी था' (Zaroori Tha) हे गाणे आहे. ज्याला १.६ अब्ज व्ह्यूज आहेत.

ध्वानी भानुशाली (Dhvani Bhanushali) हिचे गाणे 'वास्ते' (Vaaste) हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. या गाण्याला १.६ अब्ज व्ह्यूज आहेत.

या यादीत हरियाणवी गाणे '५२ गज का दामन' ( 52 Gaj Ka Dama) हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याला १.७ अब्ज व्ह्यूज आहेत.

गुलशन कुमार (Gulshan Kumar) यांच्या प्रसिद्ध 'हनुमान चालीसा'ला Youtube वर ४.६ अब्ज व्ह्यूज आहेत. हे पहिल्या क्रमांकावर आहे.