Baaghi 3 Box Office Collection: टायगर श्रॉफच्या बागी 3 ची कमाई वाचून होईल तुम्हाला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 17:32 IST2020-03-18T17:20:31+5:302020-03-18T17:32:38+5:30

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या बागी 3 या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बागी 3 ने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे.

बागी 3 या चित्रपटाला भारतातच नव्हे तर परदेशात देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टायगर श्रॉफसोबतच या चित्रपटात रितेश देशमुख देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

टायगरच्या बागी या चित्रपटाचे आतापर्यंतचे दोन्ही भाग हिट झाले आहेत.

कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे बागी ३ च्या कलेक्शनवर देखील परिणाम झाला आहे. हा चित्रपट १०० कोटीचे कलेक्शन करेल असे सगळ्यांना वाटले होते. पण अद्याप याचे कलेक्शन केवळ ९६ करोड झाले आहे.