सी ग्रेड सिनेमातून ही अभिनेत्री झाली लोकप्रिय, वयाने १९ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत थाटला संसार, आता कमावते कोट्यवधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:16 PM2024-02-12T13:16:36+5:302024-02-12T13:22:18+5:30

अभिनेत्रीने बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केले आणि तिचे जीवन बदलून गेले. ती हिट अभिनेत्री बनू शकली नसली तरी ती सुपरहिट सिनेमाची निर्माती आहे आणि कमावते कोट्यवधी.

अभिनेत्रीने बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न केले आणि तिचे जीवन बदलून गेले. ती हिट अभिनेत्री बनू शकली नसली तरी ती सुपरहिट सिनेमाची निर्माती आहे आणि कमावते कोट्यवधी.

सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी या अभिनेत्रीचं नाव सारा खान होते. प्रकाश झा यांनी तिला मान्यता हे नाव दिले. वडिलांच्या निधनानंतर तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली होती.

संजय दत्त तिच्या आयुष्यात आल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. दोघांच्या वयामध्ये १९ वर्षांचे अंतर आहे. ज्याने त्यांच्या लग्नात कधीच अडथळा आला नाही. आज संजय दत्तसोबत मान्यता लग्नाचा १६वा वाढदिवस साजरा करते आहे.

संजय दत्तने मान्यताला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंस्टाग्रामवर लिहिले की, हॅप्पी अॅनिव्हर्सरी मॉम. माझ्या जीवनातील सर्वात दमदार हिस्सा बनण्यासाठी मी आभारी आहे. मला २ अद्भूत मुलं देण्यासाठी धन्यवाद. तुझ्यावर माझे सर्वात जास्त प्रेम आहे मॉम. जग संपले तरी मी तुझ्यासोबत राहीन. तुला खूप प्रेम. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मान्यता.

अजय देवगणचा २००३ साली गंगाजल सिनेमा सोडला तर मान्यता दत्तने जास्त करून सी ग्रेड सिनेमात काम केले होते. तिने गंगाजलमध्ये आयटम साँग केले होते. या गाण्यातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. विकीपीडियानुसार, ती सी ग्रेड सिनेमा लवर्स लाइक्स असमध्येही तिने काम केले होते. ज्याचे अधिकार नंतर संजय दत्तने २० लाखात विकत घेतले होते.

मान्यताचे अभिनय कारकीर्द खूप लहान होती. मात्र आज ती प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. ती संजय दत्त प्रोडक्शन्सची सीईओ आहे आणि कोट्यवधी कमावते. मीडिया रिपोर्ट्स नुसार, मान्यता दत्तची नेटवर्थ ६९० कोटी रुपयांहून जास्त आहे.

संजय आणि मान्यताने २००८ साली लग्न केले. त्यानंतर जवळपास २ वर्षांनंतर ते एका मुलगा आणि मुलीचे पालक झाले.

४५ वर्षीय मान्यता दत्त चित्रपट निर्माती म्हणून सक्रीय आहे. ती कामानिमित्त मुंबई आणि दुबई अशा फेऱ्या मारत असते.

६४ वर्षीय संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर तो वेलकम ३च्या तयारीत व्यग्र आहे. यात अक्षय कुमार, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटनी, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लिवर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे.