या सिनेमांना लाभले नाही चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्याचे भाग्य, बोल्ड कंटेन्टमुळे झालेत बॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 08:00 IST2020-07-19T08:00:00+5:302020-07-19T08:00:02+5:30
कंटेन्टमुळे बॅन झालेले, वादात सापडलेले अनेक बॉलिवूडचे सिनेमे आहेत. यापैकी अनेक सिनेमे चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले नाहीत. पण युट्यूबवर मात्र हे सिनेमे खुलेआम पाहिले गेलेत, पाहिले जात आहेत. असेच काही सिनेमे...

अनफ्रिडम - 2015 साली आलेला हा सिनेमा राज अमित कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. होमोसेक्शुअॅलिटीसारख्या मुद्यावर आधारलेल्या या सिनेमात दोन मुलींची कथा होती. मात्र यातील बोल्ड कंटेन्ट आणि वादग्रस्त मुद्यामुळे हा सिनेमा बॅन करण्यात आला होता.
पांच - अनुराग कश्यमचा पहिला सिनेमा 1999 मध्ये बनून तयार झाला होता. यात के के मेनन मुख्य भूमिकेत होता. मात्र चित्रपटातील हिंसक दृश्ये, ड्रग्ज आणि रॉक अॅण्ड रोल कल्चरची भरमार होती. यामुळे सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा बॅन केला होता. मात्र लोकांनी युट्यूबवर हा सिनेमा बघितला. आज कल्ट क्लासिक सिनेमांमध्ये या सिनेमाचा समावेश केला जातो.
उर्फ प्रोफेसर - पंकज अडवाणीच्या या ब्लॅक कॉमेडी सिनेमातील बोल्ड दृश्ये आणि भाषा यामुळे हा सिनेमा वादात सापडला होता.
द पेंटेड हाऊस - एक म्हातारा आणि एक तरूण मुलगी यांच्या संबंधांवर आधारित हा सिनेमा त्यातील बोल्ड कंटेन्टमुळे बॅन करण्यात आला होता. युट्यूबवर मात्र हा सिनेमा उपलब्ध आहे.
हवा आने दे -पार्थो सेनगुप्ताच्या या सिनेमात भारत-पाक यांच्यातील तणाव दाखवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने यात इतके कट्स सुचवले की, ते केल्यानंतर केवळ 20 मिनिटांचा चित्रपट उरला असता. त्यामुळे दिग्दर्शकाने त्यास नकार दिला. यामुळे हा सिनेमा कधीच चित्रपटगृहांत प्रदर्शित होऊ शकला नाही.
डेज्ड इन डून - या सिनेमात एका विद्यार्थ्याची लाईफ दाखवली गेली आहे. डेहराडूनच्या डून या प्रतिष्ठित शाळेने यावर आक्षेप घेतला होता. अश्विन कुमारने हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
इंशाल्लाह फुटबॉल - 2010 मध्ये रिलीजसाठी तयार हा सिनेमा एका यंग काश्मिरी फुटबॉलपटूची कथा आहे. जो ब्राझिलला जाऊन फुटबॉल खेळू इच्छितो. अश्विन कुमारच्या या सिनेमावर सेन्सॉर बोर्डाने बंदी लादली होती. मात्र मेकर्सने प्रायव्हेटली या सिनेमाचे स्क्रिनिंग सुरू केली होती. पासवर्ड प्रोटेक्टेड प्रिंटसोबत हा सिनेमा आॅनलाइन रिलीज झाला होता.