भाई का स्वॅग देखो! 'झुंड'नंतर बदलली आकाश ठोसरची स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:00 IST2022-03-09T14:00:00+5:302022-03-09T14:00:00+5:30

Akash Thosar: गेल्या काही काळात आकाशच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये कमालीचा बदल झाल्याचं दिसून येत आहे.

सैराट या चित्रपटातून सिनेकारकिर्द सुरु करणारा अभिनेता म्हणजे आकाश ठोसर.

उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या आकाशचा झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

झुंड या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्याचसोबत आकाशही चर्चेत येत आहे.

गेल्या काही काळात आकाशच्या फॅशन सेन्स आणि स्टाइल स्टेटमेंटमध्ये कमालीचा बदल झाल्याचं दिसून येत आहे.

कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेला आकाश अनेकदा त्याचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

अलिकडेच आकाशने एक नवीन फोटोशूट केलं असून त्याच्या स्टाइलची चर्चा होत आहे.

आकाशच्या लूकमध्ये दिवसेंदिवस बदल होत असून त्याचा हा बदल चाहत्यांना आवडत आहे.

गेल्या काही काळात आकाशचा सोशल मीडियावरी वावरदेखील वाढला आहे.