पडद्यावरचे शिक्षक...! गुरू-शिष्याच्या नात्यावरचे आवर्जुन पाहावे असे काही सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 02:20 PM2021-09-05T14:20:52+5:302021-09-05T14:29:33+5:30

आज शिक्षक दिन... बॉलिवूड चित्रपटांमध्येही गुरू-शिष्याच्या खास नात्याची महती सांगितली आहे. यावरच एक नजर...

परिचय या सिनेमात विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबतच्या एका शिक्षकाच्या नात्याला अतिशय संवेदनशीलपणे दर्शवलं आहे. रवी (जितेन्द्र) पाच मुलांना शिकवण्याचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतो. या पाच मुलांमध्ये सर्वात मोठी रमा अर्थात जया बच्चन आपल्या भाऊबहिणींसोबत मिळून प्रचंड खोड्या करते. पण रवी त्यांना शिकवतो आणि त्यांच्या आपसी नात्यांतील गुंताही सोडवतो. या शिक्षकदिनी हा सिनेमा तुम्ही आवर्जुन बघायला हवा.

रूक जाना नहीं तू कहीं हार के... असा महान संदेश देणारं गाणं आठवतं असेल तर हे गाणं असलेला चित्रपटही तुम्हाला नक्कीच आठवतं असणार. या सिनेमाचं नाव आहे, ‘इम्तिहान’. 1974 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात दिवंगत अभिनेता विनोद खन्नाने प्रोफेसरची भूमिका साकारली होती. कॉलेजमधील वाया गेलेल्या मुलांना तो कसा वठणीवर आणतो आणि चांगल्या मार्गाला लावतो, अशा एक कंगोरा या सिनेमाला आहे.

बुलंदी या सिनेमात अभिनेते राजकुमार यांनी प्रोफेसरची भूमिका साकारली होती. तारूण्याच्या उन्मादात काहीशा बिघडलेल्या तरुण मुलांना कसे वठणीवर आणले जाऊ शकते आणि एक शिक्षक या किती मोलाची भूमिका साकारू शकतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. हा सिनेमाही चांगलाच गाजला होता.

इक्बाल हा 2005 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात क्रिकेटपटू व्हायचं स्वप्नं पाहणाºया इक्बाल या तरूणाची अनोखी कथा दाखवणारा हा सिनेमा. नसीरूद्दीन शहा यांनी यात त्याच्या कोचची भूमिका साकारली आहे. शिक्षक दिनी हा सिनेमा न चुकवलेलाच बरा.

गुरू-शिष्याच्या नात्यावरच्या अनेक सिनेमांच्या यादीत अमिताभ बच्चन यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाचं नावं अग्रकमानं घ्यावं लागेल. एका आंधळ्या मुलीला ब्रेल लिपी शिकवणाº्या शिक्षकाची भूमिका अमिताभ यांनी साकारली होती आणि या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

2007 साली प्रदर्शित झालेला ‘तारे जमीं पे’ हा सिनेमा म्हणजे शिक्षकदिनी आवर्जुन पाहावा असा एक आगळावेगळा सिनेमा. आमिर खानने शिक्षकाची भूमिका साकारली होती. एका आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याला कसे शिकवता येईल ते आमिरने या चित्रपटात दाखवले होते.

स्टेनली का डब्बा हा 2011 साली प्रदर्शित सिनेमा हा सिनेमा तुम्हाला भावुक करतो. एक अनाथ मुलगा केवळ शाळेत टिफिन आणू शकत नाही, म्हणून त्याला शाळेतून काढलं जाते. पण मिस रोजी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि स्टेनलीला छळणाºया टीचरशी पंगा घेते. मिस रोजीची भुमिका दिव्या दत्तानं साकारली आहे.

अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा सिनेमाही शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला वाहिलेला एक सिनेमा. राणीनं साकारलेली या चित्रपटातील नैना माथुरची भूमिका सगळ्यांच्याच पसंतीत उतरली होती. नैनाला टुरेट सिन्ड्रोम हा आजार असतो. या आजारपणामुळं सुरुवातीला अनेक ठिकाणी शिक्षकाची नोकरी नाकारली जाते. पुढे तिला नोकरी मिळते आणि 14 टवाळ मुलांना घडवण्याचं महान कार्य ती करते, हे या सिनेमात दाखवण्यात आलं होतं.

सुपर 30 हा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा. गरिब मागास 30 मुलांना एकत्र आणून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी आनंद कुमार यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची कथा या सिनेमात दाखवली गेली आहे. हृतिक रोशनने या सिनेमात साकारलेला ‘आनंद कुमार’ अफलातून म्हणायला हवा.

आय एम कलाम हा भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारलेला सिनेमा. टीव्हीवर कलाम यांचं भाषण ऐकून एक बालकामगार म्हणून काम करणाºया चिमुकल्याच्या आयुष्याची दिशाचं बदलते, असा हा सिनेमा तुम्ही न चुकवलेला बरा.

दंगल हा चित्रपट सिनेमाही गुरू-शिष्याच्या नात्यावरचा एक अप्रतिम सिनेमा. आपल्या मुलींचा गुरू बनून एक बाप त्यांना कुस्तीचे धडे देतो. या प्रवासात तो प्रचंड कठोर बनतो आणि मुलीच्या गळ्यातील मेडल बघून तेवढाच भावूक़ एक गुरू आपल्या शिष्यासाठी काय काय करू शकतो, या दृष्टिनं पाहाल तर हा सिनेमाही शिक्षकदिनी पाहता येईल असा अप्रतिम सिनेमा ठरावा.

Read in English