तमन्ना भाटियाच्या फ्लॉलेस स्किनचं सिक्रेट आलं समोर, पिंपल्स आल्यावर चेहऱ्यावर लावते 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:25 IST2025-08-03T18:16:00+5:302025-08-03T18:25:44+5:30

तमन्ना भाटियासारखं सुंदर दिसायचंय?

ग्लॅमरस अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. तिचा ग्लोईंग आणि फ्लॉलेस स्किन अनेक चाहत्यांना आकर्षित करते.

पण अनेकांना प्रश्न पडतो की तमन्नाची त्वचा इतकी नितळ आणि परफेक्ट कशी काय आहे? अलीकडेच तमन्नाने एका मुलाखतीत काही खास गोष्टी शेअर केल्या.

विशेषतः पिंपल्स (Tamannaah Bhatia Pimples Remedy) आल्यावर ती जे उपाय करते, ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या स्कीन केअर रुटीनबद्दल सांगितलं.

तमन्ना म्हणाली, "पिंपल आल्यानंतर त्या जागेवर सकाळी लाळ लावते. हो ते काम करतं. पण तो सकाळचा थुका असायला हवा. आपण दात घासण्यापूर्वीचा थुका असायला हवा".

पुढे ती म्हणाली, "मी डॉक्टर नाही, पण स्वत:चा अनुभव सांगतेय. तुम्ही सकाळी उठलेले असता त्यावेळी तुमच्या तोंडात अँटी बॅक्टीरियल एलिमेंट्स तयार झालेले असतात".

तमन्ना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अनेकदा त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी चाहत्यांनी टिप्स देत असते.

तसचं तमन्ना फिटनेस प्रेमी असून वर्कआऊटचे व्हिडीओ ती सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तमन्ना डाएटसोबत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करुन घाम गाळते अशाप्रकारे शरीराला चांगला आकार देण्यासाछी तमन्ना कसून मेहनत करताना दिसते.

दरम्यान, तमन्नाची पिंपलवर स्वत:ची लाळ लावण्याची ही पद्धत तुमच्यावर लागू होईलच असं नाही. त्यामुळे स्किन समस्यांसाठी स्वतः प्रयोग करण्याआधी तज्ज्ञ सल्ला घेणं केव्हाही उत्तम.