PHOTOS : लेकाची नाही, अण्णाच्या होणाऱ्या सूनेची चर्चा! अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 02:50 PM2021-03-31T14:50:25+5:302021-03-31T15:25:35+5:30

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण तूर्तास तरी अण्णाच्या लेकाची कमी अन् अण्णाच्या होणाऱ्या सूनबाईचीच चर्चा जोरात आहे.

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टी याचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. पण तूर्तास तरी अण्णाच्या लेकाची कमी अन् अण्णाच्या होणाऱ्या सूनबाईचीच चर्चा जोरात आहे.

होय, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या तानिया श्रॉफला डेट करतोय. आज तानियाचा वाढदिवस, अशात अहानने तानियाला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

तानिया व अहान शाळेच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत. आता हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेले आहे.

आहानने एका पोस्टमध्ये आय लव्ह यू म्हणत जाहीरपणे तानियावरच्या प्रेमाची कबुली दिली होती.

अहान व तानिया अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेट, व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतात.

अहानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तानियासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात.

अहानची कथित गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ ही बिझनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे.

तानियाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. अर्थात तिचे बालपण मात्र मुंबईत गेले़.

तानिया लंडन स्कूल ऑफ फॅशनमधून फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय. तानिया केवळ ७ वर्षांची असताना तिचे आई-वडिल जयदेव आणि रोमिला एकमेकांपासून विभक्त झालेत.

अहान लवकरच साजीद नाडियाडवालाच्या ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तारिया सुतारिया मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.