Ahan Shetty : सुनील अण्णाची होणारी सूनबाई दिसते फारच सुंदर, अहान शेट्टीची गर्लफ्रेन्ड तुम्ही पाहिलीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 02:08 PM2023-02-03T14:08:45+5:302023-02-03T14:16:56+5:30

Ahan Shetty girlfriend Tania Shroff : बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची...

बॉलिवूडचा अण्णा अर्थात सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी नुकतीच क्रिकेटपटू के एल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. आता अथियाच्या लग्नानंतर चर्चा आहे ती सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनबाईची.

होय, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी दीर्घकाळापासून तानिया श्रॉफला डेट करतोय. तानिया व अहान शाळेच्या दिवसांपासूनचे मित्र आहेत. आता हे नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे.

२०१५ साली अहान व तानिया रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते. यानंतर एका पोस्टमध्ये अहानने आय लव्ह यू म्हणत जाहीरपणे तानियावरच्या प्रेमाची कबुली दिली होती.

अरमान जैनच्या लग्नात अहान व तानिया दोघंही पहिल्यांदा कपल म्हणून पब्लिकली दिसले. आता तर हे कपल अनेकदा एकत्र फिरताना, डिनर डेट, व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतं.

अहानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तानियासोबतचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात. तानियाच्या अकाऊंटवरही अहानचे फोटो आहेत.

अहानची गर्लफ्रेन्ड तानिया श्रॉफ ही बिझनेसमॅन जयदेव श्रॉफ यांची मुलगी आहे. जयदेव हे युपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ आहेत.

तानियाने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. अर्थात तिचं बालपण मात्र मुंबईत गेलं.

तानिया लंडन स्कूल ऑफ फॅशनमधून फॅशन डिझाईनिंगचा कोर्स करतेय. तानिया केवळ ७ वर्षांची असताना तिचे आई-वडिल जयदेव आणि रोमिला एकमेकांपासून विभक्त झालेत.

अहानने साजीद नाडियाडवालाच्या ‘तडप’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावेळी सेटवर तानिया अहानसोबतच असायची.

तडप रिलीज झाला तेव्हा तिने अहानसाठी स्पेशन पोस्ट शेअर करत त्याला सपोर्ट केला होता. ती त्याची सर्वात मोठी चीअरलीडर आहे.