साऊथचा 'सिंघम सुर्या' बनला मुंबईकर, एवढ्या कोटींचं खरेदी केलंय घर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:24 PM2023-03-24T12:24:30+5:302023-03-24T12:55:43+5:30

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय.

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या जय भीम चित्रपटामुळे देशातील घराघरात पोहोचलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याने आता मुंबईत आपलं घर घेतलंय. त्यामुळे, हा साऊथस्टार आता मुंबईकर बनलाय.

दाक्षिणात्य चित्रपटातील अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता म्हणजे ‘सूर्या’. टॉलिवूडमध्ये सूर्या नावाचे मोठे त्रस्त आहे. तसेच, संपूर्ण जगात मोठी फॅन फॉलोविंगही आहे.

सुर्याचे अनेक सिनेमे जबरदस्त हिट आहेत, त्याचा प्रभावी अभिनय आणि आकर्षक व्यक्तिमत्व नेहमीच त्याला फॅन्समध्ये हिट ठरण्यास मदत करते. ‘उड़ान’, ‘जय भीम’, ‘सिंघम’ आदी अनेक चित्रपटांमुळे तो चाहत्यांचा आवडता बनलाय.

सूर्याने आता मुंबईमध्ये एक आलिशान घर विकत घेतले असून या घरात तो त्याची पत्नी ज्योतिका आणि मुलं देव, दिया सोबत राहणार आहे. मुंबईमध्ये त्याने घेतलेल्या घराची किंमत तब्बल ७० कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय त्यांच्या मुलांसाठी घेतला असून, त्यांना त्यांच्या मुलांना मुंबईमध्ये वाढवायचे आहे.

दरम्यान, चेन्नई, तामिळनाडू येथे जन्म झालेल्या सूर्या याचे मुळ नाव सरवण कुमार. सूर्या तमिळचे सुप्रसिद्ध अभिनेते शिवकुमार यांचा मुलगा होता. पण वडिलांच्या नावाचा वापर करून यशाच्या पाय-या चढणं सूर्याला मान्य नव्हतं.

म्हणूनच अनेक वर्ष त्यानं शिवकुमारचा मुलगा ही ओळख लपवून ठेवली होती. अगदी ओळख लपवून कापडाच्या गिरणीत कामही केलं होतं

सूर्याचा भाऊ कार्थी सिनेमांत होताच. पण सूर्याला चित्रपटांत फार काही रस नव्हता. यामुळं त्यानं कापड गिरणीत काम केलं होतं.

या गिरणीत जवळजवळ आठ महिने तो राबला. या आठ महिन्यात, आपण इतक्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा असल्याचं त्यानं कोणालाही कळू दिलं नाही. या कामासाठी त्याला महिन्याकाठी 1000 रूपये मिळायचे.