राजमहालापेक्षा कमी नाही विजय देवरकोंडाचं घर; पाहा Inside photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 18:39 IST2023-05-15T18:33:00+5:302023-05-15T18:39:40+5:30
Vijay Deverakonda: विजयच्या घराचा प्रत्येक कोपरा अत्यंत विचारपूर्वक सजवण्यात आला आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा.
अर्जुन रेड्डी या सिनेमाच्या माध्यमातून विजयने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
विजयची तरुणींमध्ये जास्त क्रेझ आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी त्या कायम उत्सुक असतात.
सध्या नेटकऱ्यांमध्ये विजयच्या घराची चर्चा रंगली आहे.
विजय एका आलिशान घरात आपल्या कुटुंबासोबत राहतो.
विजयच्या कुटुंबात त्याची आई-वडील आणि भाऊ आहेत.
विजयच्या घराचा प्रत्येक कोपरा अत्यंत विचारपूर्वक सजवण्यात आला आहे.
बऱ्याचदा विजय त्याच्या घरात त्याचं फोटोशूट करतो.
विजयचं घर प्रशस्त मोठं असल्याचं दिसून येतं.