साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 06:15 PM2023-09-17T18:15:02+5:302023-09-17T18:27:51+5:30

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज

Salman Khan, Hot Actress Bollywood Debut : बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणं हे फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. हल्ली साऊथ इंडस्ट्रीतील अनेक अभिनेते-अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसतात.

नुकतेच साऊथची सुपरहिट अभिनेत्री नयनताराने शाहरुख खान सोबत जवानमध्ये काम केले. जवानने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. नयनतारानंतर आता आणखी एक साऊथची अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.

ही अभिनेत्री सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सलमानच्या साथीने रोमान्स करताना दिसू शकणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून साऊथची सुपर हॉट समंथा रुथ प्रभू आहे.

समंथा साऊथ इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा मध्ये 'ऊ अंटावा' गाण्याने तिला जगभरात पोहोचवलं.

सलमान खानने चित्रपट निर्माता करण जोहर सोबत धर्मा प्रोडक्शनचा एक चित्रपट साइन केला आहे. त्यामुळे या चित्रपटातच सलमान सोबत साऊथ अभिनेत्री समंथा मुख्य भूमिकेत झळकेल असे बोलले जात आहे.

सलमान-समंथा ही जोडी पाहायला सिनेरसिकांना नक्कीच आवडेल. पण समंथा किंवा सलमानपैकी कोणीही अद्याप एकत्र काम करण्याबाबत अधिकृतपणे सांगितलेले नाही.

सध्या मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुवर्धन हा चित्रपट दिग्दर्शित करू शकतात. विष्णुवर्धन यांनी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​स्टारर शेरशाह या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

समंथा आणि सलमान खान एकत्र आले तर चाहत्यांना ऑनस्क्रीन फ्रेश आणि हॉट जोडी पाहायला मिळेल. सध्या समंथाकडून याबाबत अधिकृत वक्तव्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

समंथा सिटाडेलच्या हिंदी व्हर्जनमध्ये वरुण धवनसोबत दिसणार आहे. तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याच्या इंग्रजी व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सर्व फोटो सौजन्य- Samantha Ruth Prabhu Instagram