'आदिपुरुष'फेम अभिनेत्याचा आहे तगडा आहार; 20 पोळ्या, 25 अंडी खाणारा कोण आहे 'हा' हिरो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:33 AM2023-07-10T08:33:28+5:302023-07-10T08:39:41+5:30

Lavi pajni: या अभिनेत्याने 'बाहुबली'मध्येही काम केलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांमध्ये ओम राऊतच्या आदिपुरुषची चर्चा होती. या सिनेमाला लोकांनी चांगलंच ट्रोल केलं. त्यानंतर आता या सिनेमातील एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

आदिपुरुषमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा एक अभिनेता त्याच्या तगड्या आहारामुळे चर्चेत येत आहे.

सध्या नेटकऱ्यांमध्ये अभिनेता लवी पजनी याची चर्चा रंगली आहे.

लवीने आदिपुरुषमध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारली आहे. अलिकडेच त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या भूमिकेविषय़ी आणि आहाराविषयी भाष्य केलं आहे.

लवी पजनी हा मूळचा पंजाबमधील पटियाला येथे राहत असून त्याने एस.एस. राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर बाहुबली 2: द कन्क्लूजनमध्ये काम केलं आहे. या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

लवीने मोसागल्लू आणि राधे या सिनेमातही काम केलं आहे.

आदिपुरुषमध्ये लवीची निवड कशी झाली हे सांगताना त्याने त्याच्या आहाराविषयी भाष्य केलं.

पिळदार शरीरयष्टी असल्यामुळे लवीची आदिपुरुषसाठी निवड झाली. लवीची उंची ६ फूट १० इंच आहे. तर, वजन १४० किलो.

कुंभकर्णाच्या भूमिकेसाठी त्याला मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे त्याने ६-७ किलो वजन वाढवलं होतं.

या भूमिकेसाठी तो दररोज २० पोळ्या, २५ अंडी, १किलो चिकन आणि १.५ लीटर दूध प्यायचा.