गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 18:20 IST2021-12-28T18:20:00+5:302021-12-28T18:20:00+5:30

Samantha ruth prabhu: सध्या समंथा तिच्या बिझी शेड्युलमध्ये थोडासा ब्रेक घेत व्हेकेशनसाठी रवाना झाली आहे.

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर समंथाने तिचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे.

कलाविश्वाप्रमाणेच समंथा सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

समंथादेखील इन्स्टाग्राम वा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.यावेळी अनेकदा ती तिच्या जीवनातील लहान-सहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या समंथा तिच्या बिझी शेड्युलमध्ये थोडासा ब्रेक घेत व्हेकेशनसाठी रवाना झाली आहे.

समंथा तिच्या मैत्रिणींसोबत सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. या ट्रिपमधील अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

समंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा एक ग्लॅमरस फोटो चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये समंथा मोनोकिनीमध्ये दिसून येत आहे.

समंथाने तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केलेला फोटो.

समंथा अनेकदा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

यापूर्वीदेखील समंथाने एका बीचवरील फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.