रेशमी सोफा, क्लासिक पेंटिंग्ज अन् फुलांचं डायनिंग टेबल.. पाहा सोनमच्या लंडनमधल्या घराचे Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:10 AM2023-03-21T11:10:57+5:302023-03-21T18:22:43+5:30

सोनमच्या कपूरने तिच्या लंडनच्या घराची झलक दाखवली आहे.

sonam kapoor london house : अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) काही महिन्यांपूर्वीच मुलाला जन्म दिला आहे. सोनम पती आनंद आहुजा आणि मुलगा वायू सोबत लंडनमध्ये राहत आहे. आनंद आहुजाचा लंडनमध्ये मोठा व्यवसाय आहे.

सोनमचे लंडनमधील घर खूप आलिशान असून कोणत्या महालापेक्षा कमी नाही. तिने कालच लंडनच्या घरातील काही फोटो पोस्ट केले आहेत जे बघून चाहत्यांचे तर डोळेच उघडे राहिलेत.

सोनमने लंडनमध्ये मदर्स डे सेलिब्रेट केला. तिने कॅप्शनमध्ये लिहिले रविवारचा दिवस आणि मदर्स डे माझ्या मित्रपरिवारासोबत साजरा करत आहे. या नव्या ऋतूत घरही डेकोरेट केले आहे.

मरुन रंगाच्या कोटमध्ये बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर खूपच स्टायलिश दिसत आहे. घरातली लिव्हिंग एरियातील सोफ्यावर बसून तिने केलेले फोटोसेशन चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे.

या फोटोंमधून सोनमच्या लंडनमधील या आलिशान घराची झलक दिसते. लिव्हिंग एरियातील हिरव्या रंगाच्या सोफ्यावर तिचे फोटो आहेत तर मागे सोनम आणि आनंद दोघांचा वायूसोबतच्या फोटोची एक छान फोटोफ्रेमही आहे.

शिवाय सोनमने डायनिंग टेबलवर फुलांची सजावट केली आहे. स्प्रिंग सिझननुसार फुलं ठेवण्यात आली आहेत आणि सुंदर फ्लॉवर पॉटही ठेवला आहे. हा डायनिंग एरिया कलरफुल लाईट्स आणि फुलांनी सजवण्यात आला आहे.

एका राऊंड टेबलवर सोनमने खास पाहुण्यांसाठी खास सजावट केली आहे. टेबलवर तिने अनेक चॉकलेट्स ठेवले आहेत. एक छानसा स्नॅक ट्रे आहे. तर एका बाऊलमध्ये चॉकलेच ब्राऊनी आणि पॉपकॉर्न सारखे पदार्थ आहेत.

समोर केशरी रंगाच्या भिंतीसमोर एक खिडकी आहे. इथून सुंदर नजारा बघायला मिळतो आहे. इथे सोनमने फुगे लावले आहेत. तर पार्टीच्या मेन्यूचा फोटोही शेअर केला आहे.

सोनमचं हे आलिशान घर कोणाच्याही स्वप्नातल्या घरापेक्षा कमी नाही. तुम्हाला माहितीए का २०२० मध्ये संपूर्ण लॉकडाऊनचे एक वर्ष सोनम लंडनमध्येच राहत होती. एक वर्षांनंतर ती भारतात परत आली होती. सौजन्य : sonam kapoor instagram