मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
By देवेंद्र जाधव | Updated: June 8, 2025 17:52 IST2025-06-08T17:43:01+5:302025-06-08T17:52:13+5:30
२९ वर्षांनंतर सोनालीने हा खुलासा केला. राज ठाकरेंसोबत मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनालीने काय अट ठेवली होती, वाचा एका क्लिकवर

सोनाली बेंद्रे ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. सोनालीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. सोनालीच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना म्हणजे तिने केलेलं मायकल जॅक्सनचं स्वागत
सोनाली बेंद्रेने १९९६ मध्ये मायकल जॅक्सनच्या History World Tour च्या निमित्ताने त्याचं स्वागत केलं होतं. यावेळी सोनालीसोबत राज ठाकरेही उपस्थित होते.
मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनालीला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आमंत्रित केले होते. शर्मिला यांची सोनालीच्या कुटुंबाशी दीर्घकाळ मैत्री होती. सोनाली स्वागताला तयार झाली पण तिने एक अट समोर ठेवली होती
“मला आणि माझ्या मित्रांना मायकल जॅक्सनच्या शोची तिकिटं आणि चांगली सीट मिळावी,” अशी अट सोनाली बेंद्रेने ठेवली होती. सोनालीने २९ वर्षांनंतर हा मोठा खुलासा केला.
पुढे सोनाली मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर आली. सोनालीने पारंपरिक नववारी साडी, नथ, चंद्रकोर, केसात गजरा असा खास मराठमोळा पोशाख केला होता. तिच्यासोबत राज ठाकरेही होते
मायकल जॅक्सन मुंबई एअरपोर्टवर येताच प्रचंड गर्दी झाली. सोनालीने मायकल जॅक्सनला ओवाळून त्याचं औक्षण केलं. सोनाली अत्यंत आनंदी होती
माझ्या आणि मित्रांना मायकल जॅक्सनच्या शोची चांगली सीट मिळावी, याच इच्छेने मी हे स्वागत केलं होतं असा प्रामाणिक खुलासा सोनालीने केला होता. आजही हा खास क्षण सोनालीच्या हृदयात कायम आहे