Sonakshi Shatrughan Sinha: माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी सिन्हा स्टार बनली; अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, शत्रुघ्न सिन्हांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:05 PM2022-05-03T15:05:39+5:302022-05-03T15:12:51+5:30

Sonakshi Shatrughan Sinha: वडिलांनी सिन्हा आणि त्यांच्या मित्रांना १०० कोटींची मदत केली होती, असाही गौप्यस्फोट पूजाने केला आहे.

'बिग बॉस 5' (Bigg Boss) मध्ये दिसलेल्या पूजा मिश्राने शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि सोनाक्षी सिन्हावर गंभीर आरोप लावले आहेत. सिन्हा कुटुंबाने तिचे करिअर आणि आयुष्य बरबाद केले आहे. सिन्हा कुटुंबाने तिच्यासोबत सेक्स स्कॅम केल्याचा पूजा मिश्राने आरोप केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा आपल्याला बेशुद्ध करून ट्रेड करायचे, त्यांनी माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी सिन्हाला स्टार बनविले, मी हा प्रकार १७ वर्षे सहन केला, माझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने आत्महत्या केली असती, असा सनसनाटी आरोप पूजा मिश्राने लगावला आहे. एका मुलाखतीमध्ये पूजाने हे आरोप केले आहेत. यावर अद्याप सिन्हा कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

शत्रुघ्न सिन्हा हे माझ्या वडिलांचे खूप जवळचे मित्र होते. माझे वडील आयकर आयुक्त होते. ते मुंबईत असताना पूनम सिन्हा यांनी त्यांचे ब्रेनवॉश केले. बॉलीवूडमध्ये फक्त वेश्याच काम करतात असे त्यांना सांगण्यात आले होते. हे किती दुटप्पी होते, असे पूजा म्हणाली. सोबतच तिच्या वडिलांनी सिन्हा आणि त्यांच्या मित्रांना १०० कोटींची मदत केली होती, असाही गौप्यस्फोट पूजाने केला आहे.

२००५ मध्ये माझे वडील निवृत्त झाले आणि पुण्याला गेले. मी व्हिडीओकॉन गेस्टहाऊसला राहत होती. तेव्हा शत्रुघ्न आणि पुनम हे दोघे माझ्यावर काळी जादू करायचे. त्यांनी माझ्याकडून ३५ सिनेमे हिसकावून घेतले. माझे सर्व रस्ते बंद केले. मला सांगितले जायचे की, आम्ही नाही सलमान खानने हे केले, शाहरुख खानने हे केले, असा गंभीर आरोप पूजाने केला आहे.

माझ्या घरात ते जबरदस्तीने घुसत होते, माझे स्प़ॉन्सर्स देखील त्यांनी हिरावले. मी शत्रुघ्न सिन्हांच्या घरी २००९ ला गेले होते, त्यांनी मला काहीतरी भरविले आणि माझ्यावर काळी जादू केली. मी त्यांचा वाढदिवस जवळ येत होता म्हणून मेणबत्त्या घेऊन गेले होते, असा आरोप पूजाने शत्रुघ्न सिन्हा आणि पुनम यांच्यावर लावला आहे.

२००७ ते १४ पर्यंत मी लोखंडवाला मध्ये कुटुंबाच्या घरात राहत होते. मी सिंगापूरहून आले की ते माझ्या घरात यायचे, वरच्याच फ्लॅटमध्ये रहायचे. मी काही कपडे, वस्तू आणल्या की ते चोरायचे आणि सोनाक्षीला घालायचे. तिचा फोटो छापून आणायचे. माझ्यावरून सेक्स स्कॅम करायला लागले. मला बेशुद्ध करायचे आणि सेक्स ट्रेड करायचे. माझी व्हर्जिनिटी विकून या लोकांनी पैसे कमावले आहेत आणि सोनाक्षीला स्टार बनविले आहे. ती तर फॅशन डिझायनर बनणार होती, अचानक बॉलिवूडमध्ये कशी आली, असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

पुजा मिश्रानुसार तिला शत्रुघ्न यांनी जबरदस्तीने रिहॅबिलेशन सेंटरला पाठविले होते. तिला तिथे हेव्ही इंजेक्शन आणि औषधे देण्यात आली. शत्रुघ्न सिन्हांमुळे तिचे लग्न होऊ शकले नाही. दबंग ३ च्या वेळी मला हिरोईन म्हणून घेण्याची चर्चा सुरु होती. मात्र, तेव्हा या लोकांनी राजकारण केले. मला सहा महिन्यांसाठी रिहॅबिलेशन सेंटरला पाठविले. त्यामुळे सोनाक्षी हिरोईन बनली. मी ज्या तरुणांना आवडायचे त्यांच्याकडे सोनाक्षीला पाठविण्यात येऊ लागले, ते माझ्याशी लग्न करण्यास उत्सुक होते, असा गौप्यस्फोटही तिने केला आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी अशा बातम्या आल्या होत्या की, सलमान खानने त्याच्या भावांसोबत माझा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. मी दिल्लीत शूटिंग करत होते, त्यावेळी आणि इतर वेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी मला ड्रग्स पाजले आणि माझा गैरफायदा घेतला. माझ्या हिप्नोथेरपिस्टकडे गेल्यावर मला याची माहिती मिळाली. माझ्याशी कोणी लैंगिक संबंध ठेवले हे रिकॉल केले तेव्हा मला शत्रुघ्न सिन्हाचा चेहरा स्पष्टपणे दिसला, असा आरोप तिने केला.