'शोले'मधील अभिनेत्याला २ वर्ष पाकिस्तानात तुरुंगवास भोगावा लागला होता, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:33 IST2025-06-05T16:22:26+5:302025-06-05T16:33:20+5:30

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याला पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल २ वर्ष राहावं लागलं होतं. कोण होता हा अभिनेता?

१९७५ साली आलेला 'शोले' हा सिनेमा कोणी पाहिला नाही असा एकही माणूस आढळणार नाही. याच सिनेमातील एका अभिनेत्याला मात्र दोन वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगाच राहावं लागलं होतं

हा अभिनेता होता 'शोले' सिनेमात रहीम चाचांची भूमिका साकारणारे अभिनेते ए.के. हंगल. ज्येष्ठ अभिनेते ए. के. हंगल यांनी त्यांच्या कारकीर्दीत तब्बल ३०० सिनेमांमधून काम केलं

भारत-पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांनी कराचीमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या कम्युनिस्ट विचारधारेमुळे त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अटक केली

त्यामुळे ए.के.हंगल यांना तब्बल २ वर्ष पाकिस्तानी तुरुंगात कारावास भोगावा लागला. त्यांना कारागृहात खूप मारहाण केली जायची, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

पुढे खिशात फक्त २० रुपये घेऊन ए.के.हंगल मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी शिवणकाम करायला सुरुवात केली. हे काम करता करताच त्यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला.

त्यांनी 'शोले', 'दीवार', 'अभिमान', 'आंधी', 'नमक हराम' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले

२०१२ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांचं शेवटचं आयुष्य फार हलाखीत गेलं.