"मला खोल तलावात फेकलं गेलं अन्..."; अभिनेत्रीने सांगितला अनुभव, वडील आहेत सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:09 PM2024-03-07T16:09:39+5:302024-03-07T16:15:18+5:30

बॉलिवूडमध्ये एक नाही तर अनेक स्टारकिड्स आहेत. काहींनी स्वत:ला सिद्ध केलं तर काही गायब झाले. हा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे.

बॉलिवूडमध्ये एक नाही तर अनेक स्टारकिड्स आहेत. काहींनी स्वत:ला सिद्ध केलं तर काही गायब झाले. हा ट्रेंड वर्षानुवर्षे सुरू आहे. यामध्ये सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाचं नाव आहे. तिने सलमान खानची हिरोईन बनून करिअरची सुरुवात केली.

सोनाक्षी सिन्हाने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. पण नंतर अभिनेत्री आश्चर्यकारक कामगिरी करू शकली नाही. ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर अभिनेत्रीने असं काही सांगितलं जे ऐकून हैराण व्हाल.

फिक्की फ्रेम्सच्या 24 व्या आवृत्तीत सोनाक्षी म्हणाली की, "मला काहीही वारसा मिळालेला नाही. मी अनुभवातून शिकले आहे. मी शुन्यापासून सुरुवात केली. मला चित्रपटाच्या सेटवर येण्याचा अनुभव नव्हता. मी लहान असताना वडिलांच्या सेटवर जात नसे."

"मी अभिनय, नृत्य किंवा इतर कशाचेही प्रशिक्षण घेतलेले नाही. मी यासाठी तयार नव्हते. मला एका खोल तलावात फेकून देण्यात आलं आणि आता पोहायला शिक असं सांगण्यात आलं, मी असंच शिकले."

सोनाक्षी पुढे म्हणाली की, "ती तिच्या प्रत्येक अनुभवाची कदर करते. अभिनेत्रीने सांगितलं की, तिने काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्या विकासात योगदान दिलं, ज्यामुळे तिला या पदापर्यंत पोहोचण्यास मदत झाली."

"संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तीने हीरामंडीमध्ये 'फरीदा' सारखी गुंतागुंतीची भूमिका देऊ केली आणि ती करू शकते असा आत्मविश्वास दाखवला."

"जेव्हा त्यांनी या भूमिकेसाठी माझ्याशी चर्चा केली तेव्हा मी त्यांना म्हणाले की, अशा भूमिकेसाठी माझी निवड केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहे आणि मी सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत."

सोनाक्षीने 2010 मध्ये सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. तिने 'अकिरा' आणि 'नूर' सारख्या इतर चित्रपटातही काम केलं आहे.