Sharbani Mukherjee: बॉर्डरमधील ही सुंदर अभिनेत्री २५ वर्षांनंतर दिसतेय अशी, काजोलशी आहे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 04:47 PM2023-03-04T16:47:31+5:302023-03-04T16:51:40+5:30

Sharbani Mukherjee: १९९७ साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट झाला होता. या चित्रपटात सुनील शेट्टीने साराकरेल्या भैरों सिंहच्या पत्नीची भूमिका शरबानी मुखर्जी यांनी साकारली होती. त्यांच्यावरील ...ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो, हे गीत अजूनही आवडीने पाहिले जाते.

१९९७ साली प्रदर्शित झालेला बॉर्डर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट झाला होता. या चित्रपटात सुनील शेट्टीने साराकरेल्या भैरों सिंहच्या पत्नीची भूमिका शरबानी मुखर्जी यांनी साकारली होती. त्यांच्यावरील ...ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो, हे गीत अजूनही आवडीने पाहिले जाते.

शरबानी मुखर्जी या चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचा जन्म १९६९ मध्ये झाला होता. त्यांनी बालकलाकार म्हणून हैवान चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र बॉर्डर चित्रपटामुळे त्या सिनेप्रेमींच्या कायम लक्षात राहिल्या.

शरबानी मुखर्जी ह्या काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या नात्याने चुलत बहीण लागतात. मात्र त्यांना बॉलिवूडमध्ये आपला लक्षणीय ठसा उमटवता आला नाही.

शरबानी मुखर्जी यांची युद्धावर आधारित अत्यंत रोमान्टिक सीन आणि गीतासाठी नेहमीच आठवण काढली जाते. बॉर्डर चित्रपटात त्यांनी भैरों सिंह बनलेल्या सुनील शेट्टीच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यात लग्न होताच भैरों सिंह यांना मोर्चावर परतण्यास सांगितले जाते.

त्यावेळावर चित्रित केलेलं '...ऐ जाते हुए लम्हों जरा ठहरो जरा ठहरो' गीत सिनेरसिकांच्या कायम मनात घर करून राहिलं आहे. त्यानंतर त्यांनी मिट्टी, अंश, आंच या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र त्यांना फार यश मिळालं नाही.

बॉलिवूडमधील अपयशानंतर शरबानी मुखर्जी यांनी भोजपुरी आणि मल्याळम चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला,

शरबानी यांनी मल्याळम चित्रपटांमध्ये दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत काम केलेलं आहे. मात्र आता शरबानी मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

आता ५४ वर्षांच्या झालेल्या शरबानी यांचा लूक खूप बदलला आहे. त्या गेल्या २५ वर्षांपासून काय करत आहेत. याची काही खास माहिती उपलब्ध नाही आहे. त्या नेहमी बहीण काजोल यांच्याकडे दुर्गापूजेसाठी अवश्य उपस्थित असतात.