हॉट पण फ्लॉप... शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी जगते अलिशान आयुष्य, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:42 PM2024-04-17T17:42:09+5:302024-04-17T17:58:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी तिच्या बोल्ड लूकमुळे अनेकदा चर्चेत असते.

शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची लहान बहीण आहे. सुपरस्टार बहिणीमुळेच फिल्म इंडस्ट्रीत आली. किंग खान शाहरुखच्या 'मोहोब्बते' सिनेमातून तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. मात्र शमिताला बहिण शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सारखे यश मिळू शकले नाही.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की शमिता शेट्टीने तिच्या डेब्यू चित्रपट 'मोहब्बतें'पूर्वी एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे तिचे संपूर्ण करियर उद्ध्वस्त झाले होते.

मीडिया रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या 'मोहब्बतें'पूर्वी शमिता शेट्टीला आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाची ऑफर आली होती, पण तिने ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर तिच्या जागी ग्रेसी सिंगला चित्रपटात घेण्यात आले. शमिताने 'लगान'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असते तर कदाचित आज तिची कारकीर्द वेगळी असती.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, 'मोहब्बतें' चित्रपटानंतर शमिता एकही हिट चित्रपट देऊ शकली नाही. 2002 मध्ये रिलीज झालेला तिचा 'मेरे यार की शादी है' आणइ 'बेवफा' बॉक्स ऑफिसवरही सेमी हिट ठरले.

आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या शमिताच्या 'जेहर' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली. 2008 सालानंतर ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली.

शमिता शेट्टी सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस 15' मध्ये देखील सहभागी झाली होती. पण, ती हा शो जिंकू शकली नाही. शमिता शेवटची 2023 मध्ये 'द टेनंट' या ड्रामा फिल्ममध्ये दिसली होती.

शमिता शेट्टी आज फ्लॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण, तरीही ती आलिशान आयुष्य जगते. शमिता जरी सिनेमांपासून दूर असली तरी ती कोटयवधींच्या संपत्तीची मालकिण आहे. विविध माध्यमातून अभिनेत्री दरमहा लाखोंची कमाई करते.

शमिता एक इंटिरियर डिझायनर देखील आहे आणि तिची गोल्डन लीफ नावाची इंटिरिअर डिझायनिंग कंपनी आहे. ती ब्रँड एंडोर्समेंट देखील करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 35 कोटी रुपये आहे.

शमिता शेट्टी हिचे वय ४५ आहे. मात्र, शमिता शेट्टी हिने अजूनही लग्न केले नाहीये. अनेक अभिनेत्यांसोबत शमिता शेट्टी हिचे नावे जोडले गेले. शमिता सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल अपडेट देत असतात.