सुहानाचे बाथटबमधील फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं शाहरुखच्या लेकीला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:38 PM2024-03-19T12:38:42+5:302024-03-19T12:46:44+5:30

Suhana khan: सुहानाचे बाथटबमधील फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याची लेक सुहाना सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

अलिकडेच सुहानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

सुहाना अनेक ब्रँडचं प्रमोशन करताना दिसते. यात अलिकडेच तिने एका ब्रँडचं प्रमोशन करण्यासाठी व्हिडीओशूट केलं. मात्र, या व्हिडीओमुळे तिला ट्रोल व्हाव लागलं.

सुहानाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती बाथटबमध्ये बसल्याचं दिसून येत आहे.

सुहानाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'रमजानचा महिना सुरु असताना असे व्हिडीओ पोस्ट करणं तुला शोभत नाही', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली आहे.

सुहाना इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती. त्यामुळे वरचेवर ती चाहत्यांच्या चर्चेत यायची.

जोया अख्तरच्या द आर्चीज या सिनेमातून सुहानाने कलाविश्वात पदार्पण केलं. तसंच तिने द ग्रे पार्टमध्येही काम केलं आहे.

सुहाना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.