सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:56 PM2023-03-09T13:56:13+5:302023-03-09T14:01:00+5:30

Satish kaushik: एकेकाळी केवळ 80 रुपयांसाठी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी किस्सा सांगितला होता.

प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या ६६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेता अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली.

सतीश आणि अनुपम खेर यांची चांगली मैत्री होती. त्यामुळे सध्या त्यांच्या मैत्रीचे किस्से चर्चिले जात आहेत.

एकेकाळी केवळ 80 रुपयांसाठी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी किस्सा सांगितला होता.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक या दोघांनीही एकत्रपणे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्याकडे ८० रुपये मागितले होते.

सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना पैसे देऊन बराच काळ झाला होता. त्यामुळे ते वारंवार त्यांच्याकडे पैसे परत मागत होते.

पैसे मागूनही अनुपम खेर ते परत देत नसल्यामुळे त्यांनी अनुपम खेर यांच्यावर हात उचलला होता. त्यानंतर सतीश कौशिक यांना पैसे परत मिळाले होते.

विशेष म्हणजे या पैशांच्या देवाणघेवाणीमुळे सतीश आणि अनुपम खेर यांची घट्ट मैत्री झाली, जी अजूनपर्यंत कायम होती.