संजय लीला भन्साळींची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगलने अमन मेहतासोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 08:47 PM2023-11-27T20:47:26+5:302023-11-27T20:53:04+5:30

Sharmin Segal Wedding : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगल विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगल विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री शर्मिन सहगलने गेल्या वर्षी अमन मेहतासोबत एंगेजमेंट केली होती. आता ते विवाह बंधनात अडकले आहे. सध्या सोशल मीडियावर शर्मिन आणि अमनच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंमध्ये शर्मिन आणि अमन लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत.

शर्मिन सहगलने लग्नासाठी ऑफ व्हाइट कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. भारी मॅचिंग ज्वेलरी आणि खुल्या कुरळे केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

तर शर्मिनचा वर म्हणजेच अमन मेहताने फोटोंमध्ये पांढरी शेरवानी घातली आहे. ज्यासोबत तिने वधूच्या लेहेंग्याशी जुळणारी शाल परिधान केली होती.

शर्मिनच्या मेहेंदीची झलकही एका फोटोत पाहायला मिळते. शर्मीनच्या मेहेंदीमध्ये तिच्या कुत्र्याचा आणि तिच्या आवडत्या पिझ्झाचा फोटो आहे.

शर्मिनने २०१९ मध्ये ‘मलाल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'अतिथी देव भव' या चित्रपटात ही अभिनेत्री दिसली होती. याशिवाय नुकतीच शर्मीन 'हिरामंडी'मध्ये दिसली होती.