पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह 40 कोटींच्या आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 10:03 AM2023-07-29T10:03:15+5:302023-07-29T10:21:55+5:30

मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. सध्या मान्यता दुबईमधल्या घरात मुलांसोबत राहते आहे. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)ने कधी रोमँटिक हिरो तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. संजय दत्त आज २९ जुलैला त्याचा ६४ वा वाढदिवस साजरा करतो आहे.

'रॉकी' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीला 'साजन', 'खलनायक', 'वास्तव' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' असे अनेक चित्रपट दिले आहेत.

अभिनेता आज कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे आणि मुंबईत एका आलिशान बंगल्यात राहतो. संजय दत्तची पत्नी मान्यता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती तिच्या घराचे फोटो शेअर करत असते.

त्यामुळेच संजय दत्त आणि मान्यता यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.

लग्नानंतर मान्यताने वांद्रेतील पाली हिल येथील संजय दत्तच्या घरात गृहप्रवेश केला. तेव्हापासून या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा मान्यताने सुरेखरित्या सजवला आहे.

संजय आणि मान्यताचं घर प्रचंड आलिशान आणि प्रशस्त आहे. या घरात अनेक पेटिंग्स लावण्यात आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

घरातील प्रत्येक गोष्ट आर्टशी संबंधित आहे. मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. सध्या मान्यता दुबईमध्ये याच घरात मुलांसोबत राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.

ड्राईंग रुमपासून ते किचनपर्यंत प्रत्येक गोष्ट खास करण्यावर मान्यताने भर दिला आहे.