ना कतरिना, ना ऐश्वर्या! 'या' अभिनेत्रीसाठी सलमानने 'नो किसिंग पॉलिसी' तोडली होती, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:40 IST2025-06-12T11:15:26+5:302025-06-12T11:40:13+5:30
सलमानने त्याच्या फिल्मी कारकीर्दीत एका अभिनेत्रीसाठी नो किसिंग पॉलिसी ब्रेक केली होती. कोण होती ती अभिनेत्री? सलमानच्या चाहत्यांना यामुळे आश्चर्य वाटलंय

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे अनेक सिनेमे प्रचंड गाजले. सलमानचं त्याच्या हिरोईनसोबत अनेकदा नाव जोडलं गेलं. सलमानने मात्र सिनेमात काम करताना एक धोरण पाळलं ते म्हणजे नो किसिंग. पण एका अभिनेत्रीसोबत सलमानने ही पॉलिसी तोडली होती
सलमानने बॉलिवूडमध्य्ये आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. सलमानची जास्त जोडी रंगली ती म्हणजे ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफ. सलमानने या दोन अभिनेत्रींसाठी नव्हे तर एका अभिनेत्रीसाठी नो किसिंग पॉलिसी ब्रेक केली होती
ही अभिनेत्री आहे करिश्मा कपूर. हो तुम्ही बरोबर वाचताय. करिश्मा कपूर आणि सलमानने जीत सिनेमात काम केलं होतं.
१९९६ साली आलेल्या जीत सिनेमात सलमानने करिश्मा कपूरला किस केलं होतं, असा दावा करण्यात येत आहे. यासंबंधी एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आता सलमानने करिश्मासोबत खरंच लिपलॉक केलंय, असं काहीजण म्हणत आहेत कर काहीजण ही गोष्ट अपघाताने घडली असंही म्हणत आहेत. जीत या सिनेमात करिश्मा आणि सलमानच्य जोडीला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं
सलमानची नो किसिंग पॉलिसी पहिल्यांदा चर्चेत आली. २०१७ ला टायगर जिंदा है सिनेमात सलमान-कतरिनाचा एक बोल्ड सीन असणार होता. पण सलमानने हा सीन करायला ठाम नकार दिला
त्यामुळे ज्यांच्यासोबत सलमानचं अफेअर रंगलं, अशा ऐश्वर्या आणि कतरिनाशिवाय सलमानने करिश्मासोबत नो किसिंग पॉलिसी तोडल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.