IN PICS : साई पल्लवीला लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार, अभिनेत्रीनं सांगितला रिअल लाईफ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 02:44 PM2022-07-11T14:44:01+5:302022-07-11T14:52:14+5:30

Sai Pallavi : साईचा ‘विराट पर्वम’ नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या निमित्ताने साईने तिच्या रिअल लाईफमधील एक किस्सा शेअर केला आहे.

साई पल्लवी ही दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री. साई पल्लवीचे जगभर चाहते आहेत. तिची वेगळी ओळख करून देण्याची तशीही गरज नाही. सध्या साई ‘विराट पर्वम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

साईचा ‘विराट पर्वम’ नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात राणा दग्गुबती लीड रोलमध्ये आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने साईने तिच्या रिअल लाईफमधील एक किस्सा शेअर केला आहे.

तशी साई पर्सनल लाईफबद्दल फार कमी बोलते. पण हा किस्सा तिच्या ‘विराट पर्वम’ या चित्रपटाशी जुळलेला आहे. ‘विराट पर्वम’मध्ये साईने साकारलेली वेन्नेला आईच्या नकळत जीव धोक्यात घालून राणा दग्गुबतीला प्रेमपत्र देते. असाच एक किस्सा साईच्या रिअल लाईफमध्येही घडलेला.

होय, चित्रपटात साईने दिग्दर्शकाने सांगितल्यानुसार अभिनय केला होता. पण खऱ्या आयुष्यात तिने एका मुलाला प्रेमपत्र लिहिलं होतं आणि हे कळल्यावर आईबाबांनी तिला जाम बदडलं होतं.

तिने सांगितलं, ‘सातवीत असताना मी एका मुलाला प्रेमपत्र लिहिलं होतं. पण दुर्दैवाने मी पकडले गेले आणि आईबाबाने मला चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर कधीच मी प्रेमपत्राच्या भानगडीत पडले नाही. मला कधीच पुढे असं धाडस केलं नाही.’

साई पल्लवी हिने 2015 मध्ये प्रेमम या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिलं.

यानंतर आलेले अथिरन, मारी 2 हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली.

साई पल्लवीचे पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय आहे, तिचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील बडगा कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन आणि आईचे नाव राधा आहे. तिला पूजा नावाची एक लहान बहीणही आहे.