Sai Pallavi : पहिलाच चित्रपटात नो-मेकअप लूक, अन् दोन कोटींची जाहिरात नाकारणाऱ्या साई पल्लवीची बातचं न्यारी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 08:00 AM2023-05-09T08:00:00+5:302023-05-09T08:00:02+5:30

केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते.

साई पल्लवी ही दक्षिणेची लोकप्रिय अभिनेत्री. तिची वेगळी ओळख करून देण्याची तशीही गरज नाही.. तिचे सोशल मीडियावर लाखो फॅन फॉलोअर्स आहेत..(फोटो इन्स्टाग्राम)

साई पल्लवीचे पूर्ण नाव साई पल्लवी सेंथामराय असून ९ मे १९९२ मध्ये तामिळनाडूमध्ये तिचा जन्म झाला. आज ती तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करते आहे. साईच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन असून आईचे नाव राधा आहे. तिला पूजा नावाची एक लहान बहिणही आहे. साधेपणासाठी साई पल्लवी विशेष ओळखली जाते.(फोटो इन्स्टाग्राम)

केवळ पैशांना महत्त्व देणाऱ्या आणि तत्त्वांशी काडीचाही संबंध नसणाऱ्या कलाकारांच्या भाऊगर्दीत साई पल्लवी वेगळी ठरते. दोन कोटींची जाहिरात फक्त तिच नाकारू शकते.(फोटो इन्स्टाग्राम)

केवळ पैशांसाठी फेअरनेस क्रिमची जाहिरात करण्यास तिने नकार दिला. मी कधीच सौंदर्य प्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल तसे स्वत:ला स्वीकारा, जग तुम्हाला आपोआप स्वीकारले, असं ती म्हणते. (फोटो इन्स्टाग्राम)

साई पल्लवी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कमीतकमी मेकअपसह किंवा मेकअपशिवाय ऑन-स्क्रीन दिसते. पहिल्याच सिनेमात ती नो मेकअप लुकमध्ये दिसली होती. यालाही धैर्य लागतं.पहिल्या चित्रपटातच नो मेकअप लूकमध्ये काम केल्याने तिच्याबाबत बरीच चर्चा झाली होती.(फोटो इन्स्टाग्राम)

२०१५ मध्ये साई पल्लवीने प्रेमम या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यावेळी ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. या यशाची हवा डोक्यात जाऊ न देता साईने आपले राहीलेले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे पेशाने ती डॉक्टर असली तरी अभिनयाच्या क्षेत्रात तिने चांगलेच नाव कमावले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

राहणीमान अत्यंत साधे असलेली साई पल्लवी अनेकदा आपल्याला नो मेकअप लूकमध्ये दिसून येते. अनेकदा चित्रपटांत किंवा सामान्य आयुष्यातही तिचे नो मेअप लूकमधले फोटो आपल्यासमोर येतात, यावरुन तिचा साधेपणा लक्षात येतो. (फोटो इन्स्टाग्राम)

चित्रपटसृष्टीत फार कमी वेळात एक वेगळी ओळख निर्माण केली असून अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने स्वत:ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट केले आहे. इतकंच नाही तर तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.(फोटो इन्स्टाग्राम)

'फिदा' चित्रपटात एका खेड्यातील मुलीच्या 'पँडोरा'च्या भूमिकेसाठी खूप प्रशंसा मिळवली. हा चित्रपट 'दशकातील 100 ग्रेटेस्ट परफॉर्मन्स'च्या यादीत समाविष्ट करण्यात आला आणि सईने 'पँडोरा' या भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' म्हणून बरीच पारितोषिके पटकावली.(फोटो इन्स्टाग्राम)

अभिनयाबरोबरच साई पल्लवी ही तिच्या नृत्यकौशल्याबाबतही ओळखली जाते. नृत्यकला जोपासण्यासाठी आईने आपल्याला मदत केल्याचे साई आवर्जून सांगते. (फोटो इन्स्टाग्राम)

अतिशय कमी कालावधीत दक्षिण चित्रपटसृष्टीत नाव कमावणाऱ्या साई पल्लवीला बॉलिवूडमधूनही काही ऑफर्स होत्या. मात्र तिने त्या ऑफर्स नाकारत काही काळ तरी दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतच काम करायचे ठरवले.