PHOTOS : सोशल मीडियावर 'रोजा' फेम अभिनेत्रीच्या लेकींची चर्चा, सौंदर्याच्याबाबतीत अनन्या-जान्हवीला देतात टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 07:00 AM2022-12-07T07:00:00+5:302022-12-07T07:00:00+5:30

Actress Madhoo : दिल है छोटा सा.. हे गाणं आजदेखील चांगलंच लोकप्रिय आहे. या गाण्याचं संगीत जरी कानावर पडलं तरीही अभिनेत्री मधू डोळ्यांसमोर येते.

दिल है छोटा सा.. हे गाणं आजदेखील चांगलंच लोकप्रिय आहे. या गाण्याचं संगीत जरी कानावर पडलं तरीही अभिनेत्री मधू डोळ्यांसमोर येते. त्याकाळी तर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळच घातला होता. अभिनेत्री मधु हिला या चित्रपटानंतर रोजा अशी एक खास ओळख मिळाली.

अभिनेत्री मधूचा हा पहिला चित्रपट नसला तरीही, या चित्रपटामुळे तिची लोकप्रियता चांगलीच वाढली. पहिल्याच चित्रपटात म्हणजेच ‘फुल और काटे’मधून मधूने स्वतःचा वेगळा चाहतावर्ग कमवला होता. त्यानंतर तिने अनेक साऊथच्या आणि बॉलिवूडच्या सिनेमात काम केले.

रोजा चित्रपट तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. जेंटलमैन, यशवंत, दिलजले, एलान और जनता की अदालत सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

साऊथमध्ये देखील तिने बरेच सुपरहिट सिनेमामध्ये काम केले आहे. सध्या साऊथच्या अनेक चित्रपटामध्ये ती झळकत आहे. समंथाच्या शकुंतला या चित्रपटात देखील मधू महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मात्र सध्या मधू आपल्या कामामुळे नाही तर वेगळ्याच कारणांमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

१९९९मध्ये मधुने आनंद शाह सोबत लग्नगाठ बांधली होती.त्यानंतर तिने मोजक्याच चित्रपटात काम करायचे ठरवले. आपल्या कुटुंबाला खास करून आपल्या मुलींना वेळ देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला.

मधूला दोन सुंदर मुलींची आई आहे. तिच्या दोन्ही मुली सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात, आणि सध्या त्यामुळेच मधु चर्चेत आली आहे. अमेया आणि किया असे मधुच्या मुलीचे नाव आहे.

अमेया नुकतीच २१ वर्षांची झाली असून किया १९ वर्षांची आहे. अमेया सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर कमालीची सक्रिय असते. कायम आपले फोटोज शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

किया आता शिक्षण घेत असून अमेयाच शिक्षण पूर्ण झालं आहे. अनेक वेगवेगळ्या पार्टीमधील फोटोज त्या दोघी शेअर करत असतात. अनेकवेळा दोघीच सुट्टी घालवण्यासाठी एकत्र जातात.

टॅग्स :मधूMadhu