Ritiesh Deshmukh House : मुंबईतील पॉश ठिकाणी आहे रितेश-जिनिलियाचा आलिशान बंगला, पाहा Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 10:56 IST2023-02-09T10:52:21+5:302023-02-09T10:56:48+5:30
Ritiesh Deshmukh House: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल रितेश-जिनिलिया मुंबईत एका आलिशान बंगल्यात राहतात. पाहा त्यांच्या घराचे फोटो

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींहून जास्त कमाई केली आहे.
वेड चित्रपटातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात तर जिनिलियाने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल रितेश-जिनिलिया मुंबईत एका आलिशान बंगल्यात राहतात.
रितेश देशमुख आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील जुहूमधील आलिशान बंगल्यात राहतो. हे घर त्याने त्याच्या आवडीने सजवले आहे.
रितेश आणि जिनिलियाने आलिशान घर रॉयल बनवण्यासाठी व्हाइट टच दिला आहे. घरात छान जिने आहेत.
या आलिशान घरात लिव्हिंग रुम आहे जिथे ग्रे रंगाचे सोफे आहेत. भिंतीला ब्राउन रंग पाहायला मिळतो आहे.
यासोबतच लिव्हिंग रुममध्ये रितेशने त्याच्या वडिलांचा फोटोदेखील लावला आहे.
हा रितेश-जिनिलियाचा रुम आहे. जिथे वुडन फ्लोरिंग करण्यात आली आहे. या ठिकाणी ते दोघे बऱ्याचदा फोटोशूट करत असतात.
रितेशच्या या आलिशान बंगल्यात एक मोठे गार्डनदेखील आहे. जिथे विविध रंगांची फुले आणि झाडे लावली आहेत.
हा जिनिलियाचा आवडता कोपरा आहे. जिथे ती नेहमी फोटोशूट करते आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.