तब्बल २ वर्षांनी सुशांतचे Unseen Photos आले समोर; फोटो पाहताच चाहत्यांचे पाणावले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 03:45 PM2022-06-14T15:45:50+5:302022-06-14T15:51:21+5:30

Sushant singh rajput: सुशांतचं निधन होणं हा चाहत्यांसाठी प्रचंड मोठा धक्का होता. त्यामुळे आजही चाहते त्याच्या आठवणीत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात.

बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने जगाचा निरोप घेतला. सुशांतच्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे आजही त्याला विसरणं कोणालाही शक्य नाही.

सुशांतचं निधन झाल्यानंतर हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं. सुशांतची हत्या झाली की आत्महत्या हा मुद्दा चर्चेत आला होता. यात त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याकडेही संशयाची सुई गेली होती.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी रियाला तुरुंगवासही झाला असून सध्या तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रियाने सुशांतच्या आठवणीत त्याचे काही अनसीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

अलिकडेच रियाने सुशांतचे असे काही फोटो शेअर केले आहेत जे नेटकऱ्यांनी कधीच पाहिले नव्हते.

या फोटोमध्ये सुशांत मनमुरादपणे आयुष्य जगण्याचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

'दररोज तुझी न चुकता आठवण येते', असं कॅप्शन देत रियाने हे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावणारा अभिनेता म्हणून सुशांतकडे पाहिलं जात होतं.

सुशांतचं निधन होणं हा चाहत्यांसाठी प्रचंड मोठा धक्का होता. त्यामुळे आजही चाहते त्याच्या आठवणीत वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात.