रंग दे बसंती, लगान ते उरी...या प्रजासत्ताक दिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:25 AM2024-01-26T08:25:13+5:302024-01-26T09:23:33+5:30

आज सर्वत्र ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे हे काही सिनेमे पाहून तुम्ही नक्कीच प्रजासत्ताक दिन साजरा करु शकता. निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या.

'रंग दे बसंती' या सिनेमात अमीर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील तरुणांप्रमाणेच काम केले तर गोष्टी कशा बदलू शकतात हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाने केला आहे. नवीन पिढीला भ्रष्टाचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करतो.तुम्ही हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

'स्वदेश' हा सिनेमा नासामध्ये कार्यरत असलेल्या मोहनच्या आयुष्यावर भाष्य करतो. सिनेमात शाहरुख खानने मोहनची भूमिका साकारली आहे. तो आपल्या गावातील लोकांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करतो. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान हा ब्रिटीश राजवटीचा काळ दाखवतो. या सिनेमाची कथा एका गावाभोवती फिरते. लगान हा 1893 मधील भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या व्हिक्‍टोरियन काळातील कथेवर आधारित होता. आमिर खान प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. हा सिनेमा Netflix वर उपलब्ध आहे. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता.

‘संदेसे आते हैं हमें तडपाते हैं...’ हे गाणं ओठांवर आलं की, सहज नाव ओठी येते ते ‘बॉर्डर’ चित्रपटाचे. हा चित्रपट म्हणजे एक माईलस्टोन आहे. अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि सनी देओल यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या सत्य घटनेवर आधारित बॉर्डर हा चित्रपट बनवला होता. अॅमझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.

जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे. हा सिनेमा पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सिनेमात विकी कौशलने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे.

'शेरशाह' या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने 'कॅप्टन विक्रम बत्रा' यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. हा भारतातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

बॉलिवूडची सुपरस्टार आलिया भट्टचा सर्वाधिक चर्चेत राहिलेला 'राझी' चित्रपट Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा मेघना गुलजार दिग्दर्शित सिनेमा आहे. आपल्या देशापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणाऱ्या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा यात रेखाटण्यात आली आहे. राझी हा सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. सेहमत या तरुणीची ही गोष्ट आहे.

'द लीजेंड ऑफ भगत सिंग' हा देशभक्तीवर आधारित अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अजय देवगणने भगतसिंगची मुख्य भूमिका केली होती. तुम्ही Amazon Prime Video वर हा सिनेमा पाहू शकता.

वयाच्या चोविसाव्या वर्षी कारगिलच्या युद्धभूमीवर कर्तृत्व गाजवणा गुंजन सक्सेना यांची प्रेणादायी गोष्ट सिनेमातून मांडली आहे. जान्हवी कपूरने गुंजन यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. गरिबांचे हक्क, शेतकऱ्यांची आत्महत्या अशा विषयांवर या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारने जवानचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, नयनतारा, विजय सेतुपथी, सुनिल ग्रोव्हर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

मिशन मजनू या चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा एका रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. मिशन मजनू हा चित्रपट हृदयाला स्पर्श करणारा आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.

लक्ष्य हा फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात हृतिक रोशन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन, ओम पुरी आणि बोमन इराणी हे कलाकार आहेत. कारगिल युद्धाच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित ही कथा आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहू शकता.