'3 इडियट्स'मधील 'चतुर रामालिंगम' आठवतोय का?, ओमी वैद्य आता दिसतो असा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 01:18 PM2023-09-07T13:18:11+5:302023-09-07T13:22:17+5:30

'3 इडियट्स' हा बॉलिवूडमधला क्लासिक चित्रपटांपैकी एक आहे. हा असा चित्रपट आहे, जो लोक आजही तितक्याच आवडीने पाहतात.

थ्री इडियट्स हा बॉलिवूडमधला क्लासिक चित्रपटांपैकी एक आहे. हा असा चित्रपट आहे, जो लोक आजही तितक्याच आवडीने पाहतात. चित्रपटातील सर्व पात्र खूपच युनिक होते आणि यातील सर्व भूमिका खूप लोकप्रिय झाल्या. मात्र थ्री इडियट्समध्ये एका पात्राने प्रेक्षकांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडले होते. हे पात्र म्हणजे 'चतुर रामालिंगम'.

'चतुर रामालिंगम'ची भूमिका अभिनेता ओमी वैद्यने साकारली होती. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं 'चतुर रामालिंगम' आणि साइलेंसर असे नाव होते. चित्रपटात ओमी वैद्यचं स्पीच ऐकून लोकांना हसू आवरता येत नव्हते.

२००९ मध्ये ३ इडियट्स रिलीज होऊन बराच काळ लोटला आहे आणि या सर्व वर्षांमध्ये आपल्या लाडक्या ओमी वैद्य म्हणजेच चतुर रामलिंगमचा लूकही खूप बदलला आहे.

ओमीचा नवा लूक पाहून लोक नाराज झाले आहेत आणि तो ठीक आहे का, अशी विचारणा करत आहेत. वास्तविक, ओमी वैद्यने काही काळापूर्वी त्याचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तो व्हाइट मल्टी कलर शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये दिसत होता.

या फोटोंमध्ये ओमी खूपच फंकी लूकमध्ये दिसतो आहे. ओमीच्या गळ्यात साखळी आणि चष्मा घालून मस्त दिसतो आहे. ओमीच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे.

समोर आलेल्या ओमी वैद्यच्या नव्या फोटोमध्ये त्यांची अतिशय स्टायलिश स्टाईल पाहायला मिळत आहे. ओमी वैद्यच्या या फोटोंवर सोशल मीडिया यूजर्सकडून मजेशीर प्रतिक्रियाही आल्या आहेत.

फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'सायलेन्सर आता मस्त दिसत आहे, गोंडस नाही'. तर दुसऱ्याने लिहिले, 'काय झाले सर, सर्व ठीक आहे ना'.