IN PICS : श्रीवल्ली ते सुहाना..., या सोशल मीडिया सेन्सेशन बॉलिवूड गाजवणार...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:44 PM2022-02-13T16:44:11+5:302022-02-13T16:51:05+5:30

Bollywood debut in 2022 : सोशल मीडिया सेन्सेशन असलेल्या अनेकजणींचा या वर्षात बॉलिवूड डेब्यू होणार आहे. काहींचा डेब्यू पक्का आहे तर काही जणींच्या डेब्यूची जोरदार चर्चा आहे. यावर एक नजर...

नॅशनल क्रश, सोशल मीडिया सेन्सेशन रश्मिका मंदानाने साऊथ इंडस्ट्री गाजवली. आता ती बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या सिनेमात दिसणार आहे.

मानुषी छिल्लर इन्स्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहे. मानुषी लवकरच अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

शाहरूख खान व गौरी खानची लेक सुहाना खानही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. जोया अख्तरच्या सिनेमातून सुहानाचा डेब्यू होणार असल्याच्या चर्चा जोरात आहेत. अर्थात अद्याप याबाबतची घोषणा झालेली नाही.

संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूरही सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. तिची फॅन फॉलोइंग बॉलिवूड नट्यांपेक्षा कमी नाही. लवकरच शनाया करण जोहरच्या सिनेमातून डेब्यू करू शकते.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची धाकटी लेक खुशी कपूर ही सुद्धा लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. सुहाना खानसोबत जोया अख्तरच्या सिनेमातूनच खुशी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे कळतेय.

अलिजे अग्निहोत्री ही अतुल अग्निहोत्रीची मुलगी आणि सलमान खानची भाची अलिजे अग्निहोत्री हिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण आता या डेब्यूची तयारी सुरू झाली आहे.सलमानची हिट फ्रेन्चाईजी ‘दबंग 3’ मधून अलिज२ डेब्यू करणार अशी चर्चा होती. पण आता तिच्यासाठी खास प्रोजेक्ट डिझाईन केला जात असल्याचं म्हटलं जातंय.

वरूण धवनची पुतणी अंजिनी धवन हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. वरूण धवनला करण जोहरने लॉन्च केलं होतं. आता अंजिनीलाही करण जोहरच लॉन्च करणार असल्याचं कळतंय. अंजिनी सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.